क्रिकेट खेळण्यासोबच सरकारी नोकरी सुद्धा करतात हे दिग्गज खेळाडू, पहा कोण आहे कोणत्या पदावर..!

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सर्वजन रात्रंदिवस मेहनतकरतात, पण भारतीय संघासाठी खेळणे हे त्यापेक्षा मोठे स्वप्न आहे, पण प्रत्येक तरुणाचे स्वप्न पूर्ण होत नाही. देशांतर्गत क्रिकेटही खेळण्यास फार कमी तरुण खेळाडू सक्षम आहेत, फार कमी खेळाडूंना भारताकडून खेळण्याची संधी मिळते. क्रिकेट खेळाबद्दल बोलायचे झाले तर क्रिकेट बोर्ड क्रिकेटपटूंना करोडोंचे मानधन देते. अनेक खेळाडू सरकारी नोकरीतही चांगली कामगिरी करतात. आज या ब्लॉगमध्ये आम्ही अशा क्रिकेटर्सची माहिती देणार आहोत ज्यांच्याकडे चांगली सरकारी नोकरीही आहे.

सचिन तेंडुलकर: या यादीतील सर्वात मोठे नाव म्हणजे भारतीय वायुसेनेत ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत असलेल्या सचिन तेंडुलकरचे. सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज आहे. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा विक्रम आहे, जो कोणत्याही फलंदाजाला तोडणे अशक्य आहे. क्रिकेट सोबतच सचिनने वायुसेनेत ग्रुप कॅप्टन पदावर कार्य निभावले आहे.

केएल राहुल: केएल राहुल हा भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. सरकारी नोकरीबद्दल बोललो तर राहुल RBI मध्ये असिस्टंट मॅनेजर देखील आहेत. RBI बँकेच्या जाहिरातींमध्येही आपण अनेकदा पाहतो. केएल राहुल आता येणाऱ्या काही सामान्य मध्ये भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

महेंद्रसिंग धोनी: या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने तब्बल २८ वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवले. याशिवाय धोनीने २००७ मध्ये भारताला T-२० चॅम्पियन बनवले आणि २०१३ मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. तो एक क्रिकेटर तसेच लेफ्टनंट कर्नल आहे. धोनी हा दिग्ग्जच क्रिकेटर च्या लिस्ट मध्ये येतो त्याने भारताला बरेच सामने जिंकवून इंडियन क्रिकेट ला एक उंची वर पोहचवले आहे.

युझवेंद्र चहल: युझवेंद्र चहल हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. तो अनेकदा त्याच्या कॉमेडी स्टाइलसाठी ओळखला जातो, ज्यामुळे तो सर्वांचा लाडका बनला आहे. या खेळाडूची इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर नियुक्ती झाली आहे. , त्यामुळे युझवेंद्र चहल हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज असला तरी इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर सुद्धा आहे.

उमेश यादव: उमेश यादव हा टीम इंडियाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आहे. उमेश यादव यांनी पोलीस हवालदार होण्याचे स्वप्न पाहिले असले तरी सध्या ते भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्याच्या चाहत्यांनी त्याला केएल राहुलसोबत आरबीआयच्या जाहिरातींमध्ये पाहिलेच पाहिजे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप