आई कुठे काय करतेमधील अरुंधतीने उचललं यशस्वी पाऊल! केला हक्काच्या घरात प्रवेश.. मालिका आता नव्या वळणावर!

आई कुठे काय करते या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेला सध्या रंजक वळण मिळाले आहे. चारित्र्यावर संशय घेतल्याने अरुंधतीने देशमुखाचं घर आता कायमच सोडलं आहे. यानंतर ती मित्र आशुतोषच्या साहाय्याने नवीन घरा शोधाण्याच्या मोहिमेत लागली होती. परंतु एकटी आणि त्यात घट स्फोट घेतल्याने तिला सगळीकडून नकारघंटा मिळत , घर मिळण्यास अडथळा येत होता. पण असे असले तरी आता मात्र अरुंधतीला नवीन तिच्या स्वप्नाचं घर मिळालं आहे! देशमुखांनी जरी तिच्यासाठी त्यांच्या घराचे दरवाजे बंद केले असले तरी तिला आता हक्काचं घर मिळालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

नुकताच एक प्रोमो स्टार प्रवाह वाहिनी कडून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अरुंधती एका ठिकाणी आशुतोषसोबत घर पाहण्यासाठी गेलेली असते यावेळी अरुंधती घरमालकिणीला तिची सत्य परिस्थिती सांगते. मी घट स्फोटीत आहे शिवाय माझ्याकडे माझी मुलं, दीर, आई, भाऊ आणि मित्र आशुतोष देखील येईल. मी एकटी राहाणार आहे. हे ऐकल्यानंतर दया येऊन घरमालकिण देखील अरुंधतीला घर देण्यास तयार होते. ती म्हणते, “मी देखील सिंगल वुमन आहे आणि मला देखील अशा अडचणी आल्या होत्या. मला तुम्हाला घर द्यायला कसलाच प्रॉब्लेम नाही. आजपासून घर तुमचं..” असं म्हणत त्या त्यांचे घर अरुंधतीच्या ताब्यात देतात. त्यामुळे आता लवकरच अरुंधती तिच्या हक्काच्या घरात प्रवेश करताना दिसणार आहे. प्रेक्षकांना देखील अरुंधतीने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक वाटत आहे. यावर सकारात्मक कमेंट करत अनेकांनी अरुंधतीला पाठींबा दर्शवला आहे.

अरुंधतीनं अनिरुद्धसोबत घट स्फोट घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने तिच्या नव्या आयुष्याला सुरूवात झाली आहे. या पडत्या काळातच तिच्या मदतीला तिचा मित्र आशुतोष धावून आला आहे. आशुतोषनं तिला गाण्याची संधी दिली शिवाय उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी देखील. आता साधीभोळी अरुंधती तिच्या प्रवासात स्वप्नासाठी जगताना दिसते. तिला काय वाटतं हे मोकळेपणाने व्यक्त करताना दिसते. तिची लढाई ती एकटीनं लढत आहे पण आशुतोषच्या रूपाने धीराचा एक खंबीर हात तिच्या सोबत भक्कम उभा ठाकला आहे. तिच्या या लढाईत संजना, अनिरुद्ध अनेकदा अडथळे निर्माण करताना दिसतात. आता तर सासूबाई कांचन यांनी देखील संजनाच्या नादी लागून अरुंधतीकडून तिचा घरातील हिस्सा स्वतःच्या नावावर करून घेतला आहे. असं जरी असलं तरी अरुंधतीची आताची प्रगती पाहता ती सध्या भाड्याच्या घरात राहत असली तरी लवकरच ती देशमुखांच्या समोरच मोठं घर घेईल यात काहीच विवाद नाही.

अरुंधतील नवीन घर मिळाल्याचे समजल्यानंतर संजना, अनिरुद्ध यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे एवढं नक्की!

 

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप