‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधतीच्या धाकट्या दिराची पत्नी देखील आहे प्रसिद्ध कलाकार, नाव जाणून व्हाल आश्चर्यचकित!!

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीच्या लहान दीराची भूमिका निभावणारा कलाकार म्हणजे अविनाश होय. अविनाश यांचे खरे नाव शंतनु मोघे असे आहे. अनेक मराठी मालिका तसेच नाटक व सिनेमांमध्ये काम करत शंतनु मोघे अनेकदा झळकला आहे!

शंतनु मोघे याच्याप्रसिध्द मालिकांची नाव सांगायची झाली तर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत देखील त्याने महत्वाची भूमिका निभावली होती. या मालिकेत त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकार केली होती. या भूमिकेमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात उच्च दर्जाचे स्थान निर्माण करण्यात यश मिळवलेले. यानंतर श्रीराम समर्थ या चित्रपटात देखील शंतनू महत्वपूर्ण रोल निभावत झळकला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

सध्या आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत शंतनुला अविनाशचे पात्र साकारताना आपण सर्वच जण बघत आहोत. ही भूमिका तस बघायला गेले तर अतिशय शांत आणि संयमी अशा स्वरूपात अविनाश पार पाडताना दिसत आहे. नेहमीच घरातील वाद विवाद कसे टाळल्या जातील, हाच प्रयत्न अविनाशकडून कायम केल्या जातो.

तसेच तो आपल्या वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला दिसतो. हे देखील आपण नुकत्याच झालेल्या आई कुठे काय करते या मालिकेतील एका भागात झालेल्या जोरदार वाद-विवादात पाहिले आहे. यावेळी अरुंधती घर सोडून जाते, तेव्हा तिच्या पाठीशी अविनाश हा मोठ्या भावासारखा खंबीरपणे उभा राहतो आणि वहिनी तू स्वतःची काळजी घे, असे सांगतो. या मालिकेत ज्याप्रमाणे अविनाशचे सुखी कुटुंब दाखवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

त्याचप्रमाणे अविनाशच्या वैयक्तिक आयुष्यातील देखील त्याचा परिवार असाच छान आहे. आपल्या लाडक्या कलाकाराच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच त्यांची फॅनफॉलोविंग उत्सुक असते. अभिनेत्यांच्या खाजगी आयुष्यात त्यांचे कौटुंबिक जीवन असेल अथवा त्यांच्या परिवारात कोण कोण सदस्य आहेत? त्यांच्या बहीण – भावा विषयी माहिती हे सर्व जाणून घेण्यासाठी रसिक प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले दिसतात.

अशीच काहीशी माहिती शंतनु मोघे याच्या बद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. त्याची पत्नी ही देखील अभिनय क्षेत्रातच असून ती तिच्या अभिनयामुळे देखील मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे. शंतनु मोघे याची पत्नी दिसायला देखील खूप सुंदर आहे. तुम्हाला सर्वांना तिचे नाव समजल्यावर लगेच डोळ्यासमोर येईल ती ‘तू तिथे मी’ ही सदाबहार मालिका!

या मालिकेत नकारात्मक भूमिका यशस्वीपणे पार पाडुन आपला छाप उठवणारी दमदार अभिनेत्री म्हणजे ” प्रिया मराठे” ही शंतनु मोघे याची बायको आहे. प्रिया मराठे हिने तू तिथे मी या मालिकेत निभावलेली नकारात्मक भूमिका खूपच गाजली होती. आतापर्यंत प्रिया मराठे हिने अनेक हिंदी व मराठी मालिकांमधून काम केले आहे. प्रिया मराठे हिने ‘या सुखांनो या’ या मालिकेपासून छोट्या पडद्यावर आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

आपल्या लाघवी अभिनयामुळे तिला एकानंतर एक मालिका मिळतच गेल्या. तिच्या प्रसिद्ध हिंदी मालिकांची नावे सांगायची झाली तर कसम से, पवित्र रिश्ता, बडे अच्छे लगते है, इत्यादी हिंदी मालिकांचा इथे प्रामुख्याने उल्लेख करता येईल. पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेमुळे तर प्रिया मराठे ही महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सध्या प्रिया मराठे ही येऊ कशी तशी मी नांदायला या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत काम करताना दिसत आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप