नवऱ्याने विकेट घेताच धनश्री झाली आनंदाने वेडी, नजारा पाहून चाहतेही झाले थक्क..!

आयपीएल २०२२ च्या १३ व्या सामन्यात, युझवेंद्र चहलने त्याच्या जुन्या संघ RCB विरुद्ध शानदार गोलंदाजी केली परंतु त्याच्या गोलंदाजी मुळे राजस्थान रॉयल्सला सामना जिंकता आला नाही आणि शेवटच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने ६ गडी गमावून हा सामना जिंकला. जरी या सामन्यात अनेक रोमांचक आणि मनोरंजक क्षण होते, परंतु एक क्षण असा होता जिथे लक्ष वेधले गेले युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने.

युझवेंद्र चहलने ९ व्या षटकात आरसीबीचा फलंदाज डेव्हिड विलीला क्लीन आउट करताच स्टँड मध्ये बसलेल्या त्याच्या पत्नीने आनंदाने उडी मारली. चहल च्या या विकेट वर धनश्री इतकी खूश झाली की तिने पूर्ण उत्साहात हात हलवायला सुरुवात केली, हे दृश्य पाहून स्टँडवर बसलेले चाहतेही आश्चर्यचकित झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals)

या सामन्यात राजस्थान चा पराभव झाला असेल, पण चहलने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने सिद्ध केले की, त्याला लिलावात न घेऊन आरसीबीने खूप मोठी चूक केली आहे. या सामन्यात चहल ने चार षटकांच्या कोट्यात केवळ १५ धावा दिल्या आणि दोन मौल्यवान विकेट घेतल्या होत्या. चहल शिवाय ट्रेंट बोल्ट ने ही दोन विकेट घेतल्या मात्र उर्वरित गोलंदाजांनी धावा दिल्या त्या मुळे आरसीबी ने सामना सहज जिंकला.

या स्पर्धेतील राजस्थान चा आरसीबी विरुद्ध चा पहिला पराभव आणि आता त्यांचे ३ सामन्यांत २ विजय आणि एका पराभवा सह चार गुण झाले आहेत, तर फाफ डू प्लेसिस चा संघही ३ सामन्यात २ विजया सह ४ गुणांवर आहे. RCB चा नेट रनरेट थोडा कमी आहे, ज्यामुळे ते गुणतालिकेत सहाव्या स्थाना वर आहेत.

युझवेंद्र चहल ने २०१३ साली कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स कडून खेळून आपल्या आयपीएल कारकिर्दी ची सुरुवात केली होती. हा सामना २४ एप्रिल २०१३ रोजी कोलकात्या च्या ईडन गार्डन्स स्टेडियम वर खेळला गेला होता. या सामन्यात युझवेंद्र चहल ने ४ षटकात ३४ धावा दिल्या होत्या आणि त्याला कोणतेही विकेट मिळाली न्हवती. मात्र, हा सामना मुंबई इंडियन्सने ५ विकेटने जिंकला होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप