रोहित शर्मा येताच हे २ खेळाडू जाणार संघाबाहेर, येकाची जाणार कॅप्टन्सी व दुसरा संघाबाहेर..!

भारतीय संघाची नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली नाही. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाने नववर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले पण वर्षभरात दोन सीरीज गमावल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेसोबतची कसोटी मालिका आणि त्यानंतर वनडे फॉरमॅटची मालिका हातातुन गेली आहे. त्यानंतर मर्यादित षटकांमध्ये रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर केएल राहुलला कर्णधारपद सोडावे लागेल. तसेच पुढील मालिकेत या खेळाडूला संघात जागा मिळणे काठीन आहे.

विराट कोहलीच्या जागी भारतीय संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. मात्र मुंबई कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने रोहित शर्मा संघातून बाहेर झाला होता. त्यानंतर केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. पण केएल राहुल कर्णधार म्हणून पहिल्या मालिकेत सपशेल अपयशी ठरला आहे. केएल राहुल आयपीएलमध्ये पंजाबचा कर्णधार आहे. आता तो लखनौचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

केएल राहुल बॅटने चांगली कामगिरी करतो पण कर्णधारपदात त्याचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. विराट कोहलीला दुखापत झाल्यानंतर केएल राहुलकडे कसोटी मालिकेतही कर्णधारपद सोपवण्यात आले होते. पण तो सामना भारतीय संघ हरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा सामना गमावण्या बरोबरच संघाने मालिकाही गमावली आहे.

रोहित शर्मा श्रेयस अय्यरला त्याच्या संघातून वगळू शकतो, जो भारतीय संघाच्या मधल्या फळीत काही खास कामगिरी करू शकला नाही. श्रेयस अय्यर संघात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत तो पूर्णपणे निष्प्रभ दिसला आहे. दुखापतीनंतर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे तो बराच काळ संघाबाहेर होता. पण न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणात शतक झळकावल्यानंतर तो संघात परतला होता. पण एकदिवसीय सामन्यांमध्ये तो आपला प्रभाव दाखवू शकला नाही, त्यामुळे रोहित शर्मा श्रेयस अय्यरला संघातून वगळू शकतो.

मधल्या फळीत रोहित शर्माच्या आगमनामुळे त्याचा मुंबई इंडियन्स संघातील सहकारी सूर्यकुमार यादवला स्थान मिळू शकते. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने मधल्या फळीत भारतीय संघात चांगली कामगिरी केली आहे. मुंबईत प्रशिक्षणादरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली होती. थ्रो डाऊन स्पेशलिस्ट राघवेंद्रचा चेंडू सरळ हातावर गेल्याने रोहितला ही दुखापत झाली होती. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, प्रथम अजिंक्य रहाणेने ४५ मिनिटे फलंदाजी केली होती. रहाणेनंतर रोहित शर्मा सरावासाठी आला होता. यादरम्यान चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागला होता.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप