रोहित शर्मा कसोटी कर्णधार होताच अॅडम गिलख्रिस्टचे १३ वर्ष आधीचे विधान झाले व्हायरल..!

टीम इंडिया गेल्या काही काळापासून मोठ्या बदलातून जात होती. या पूर्वी रवी शास्त्री च्या जागी राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर विराट कोहलीने T-२० चे कर्णधारपद सोडले आणि त्याच्या जागी रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले होते. त्यानंतर वनडे संघाची कमान ही रोहित शर्मा कडे सोपवण्यात आली होती.

मात्र, आफ्रिका दौऱ्याच्या कसोटी मालिके नंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधार पद सोडले तेव्हा पुढील कसोटी कर्णधार कोण असेल, असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. दिवसे दिवस टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदा साठी नवनवे दावेदार उदयास येत होते. मीडिया रिपोर्ट्स मध्ये कधी केएल राहुल, कधी ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह तर कधी रोहित शर्माचे नाव येत असे. पण, आता या सर्व नावांमध्ये टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. म्हणजेच आता तो T-२०, ODI आणि कसोटी या तिन्ही संघांचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

आयपीएलच्या कर्णधारपदाच्या काळातच रोहितने आपण उत्तम कर्णधार असल्याचे दाखवून दिले आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माने आयपीएल मध्ये एकूण १३४ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. यादरम्यान त्याने ७९ सामने जिंकले आहेत. तर ५१ सामने हरले आहेत. तसेच ४ सामने टाय झाले आहेत. म्हणजेच रोहितच्या नेतृत्वा खालील विजयाची टक्केवारी ६० टक्क्यांहून अधिक आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट बद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माने आता पर्यंत २४ टी-२० सामन्यां मध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्या पैकी २० सामने त्यांनी जिंकले आहेत. त्याच वेळी, त्याने एकदिवसीय क्रिकेट मध्ये १३ सामन्यां मध्ये नेतृत्व केले आहे, ज्या मध्ये टीम इंडियाने ११ सामने जिंकले आहेत. एकूणच, रोहित शर्माची कर्णधारपदाची आता पर्यंत ची कारकीर्द खूपच चांगली राहिली आहे. आता तो त्याच मार्गाने पुढे जाईल आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेईल, अशी अपेक्षा आहे.

रोहित शर्माला कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बनवल्या नंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट चे एक जुने विधान व्हायरल झाले आहे. गिलख्रिस्टने २००९ मध्ये सांगितले होते की, रोहितने उपकर्णधाराची भूमिका खूप गांभीर्याने घेतली आहे आणि एक दिवस तो कर्णधार होईल.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप