आयसीसी च्या सुधारित क्रमवारीत भारतीय गोलंदाजांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गोलंदाजी क्रमवारीत भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे वर्चस्व कायम आहे. या ताज्या क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत टॉप-५ मध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. याशिवाय आयसीसी कसोटी क्रमवारीत कोणते बदल झाले आहेत त्यावर एक नजर टाकूया.
ICC टेस्ट रँकिंग च्या ताज्या क्रमवारी नुसार, गोलंदाजांच्या यादीत टॉप-५ मध्ये दोन भारतीय नावांचा समावेश आहे, ज्यामध्ये एक नाव ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचे आहे आणि दुसरे नाव जसप्रीत बुमराहचे आहे. अश्विन ने कसोटीत आपली क्रमवारी कायम राखली असून तो दुसऱ्या क्रमांका वर कायम आहे, तर जसप्रीत बुमराहला एक स्थान गमवावे लागले आहे आणि तो तिसऱ्या क्रमांका वरून चौथ्या स्थाना वर गेला आहे.
View this post on Instagram
आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादी बद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स या यादीत पहिल्या क्रमांका वर कायम आहे. कमिन्स ९०१ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थाना वर कायम आहे. दुसरीकडे, टीम इंडियाचा रविचंद्रन अश्विन ८५० रेटिंग गुणांसह दुसऱ्या आणि न्यूझीलंडचा काइल जेम्सन ८३६ रेटिंगसह तिसऱ्या स्थाना वर आहे. जसप्रीत बुमराह ८३० रेटिंगसह चौथ्या आणि पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी ८२७ रेटिंग सह पाचव्या स्थाना वर आहे.
View this post on Instagram
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत एकूण ६ बळी घेऊन न्यूझीलंडचा गोलंदाज काईल जेम्सन ने ICC कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत दोन स्थानांची प्रगती केली आहे. जेमसन सध्या ८३६ रेटिंग सह पाचव्या स्थान वरून तो तिसऱ्या क्रमांका वर आला आहे. त्याच्या वाढी मुळे भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांना प्रत्येकी एक स्थान गमवावे लागले आहे.
याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा ८१८ रेटिंगसह सहाव्या स्थाना वर आहे, इंग्लंडचा जेम्स अँडरसन ७७२ रेटिंगसह सातव्या आणि न्यूझीलंडचा टीम साऊथी ७६९ रेटिंगसह आठव्या स्थाना वर आहे. न्यूझीलंडचा नील वॅगनर ७६९ रेटिंगसह नवव्या, तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ७५२ रेटिंगसह १० व्या स्थाना वर आहे.