IPL २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी, १२.५ कोटींचा हा खेळाडू IPL खेळणार नाही..!

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने IPL २०२२ च्या मेगा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, तो जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी काउंटी चॅम्पियनशिप खेळणार आहे, ज्यासाठी त्याने एक मोठे पाऊल उचलले आहे. याशिवाय इंग्लंडचा कर्णधार जो रुटही लिलावात आपले नाव देणार नाही.

ऍशेस मालिकेतील ४-० अशा पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर सह अनेक माजी क्रिकेटपटूंनी कसोटीतील खेळाडूंच्या खराब कामगिरीसाठी टी-२० लीगला जबाबदार धरले होते. IPL २०१८ च्या मेगा लिलावात विकला जाणारा स्टोक्स हा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने १२.५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. झेल घेताना बोटाला दुखापत झाल्यामुळे स्टोक्स आयपीएल २०२१ च्या फक्त एका सामन्यात खेळू शकला होता. मानसिक प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकला नाही.

अॅशेस मालिकेतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते, जरी त्याची कामगिरी तो ज्या स्तरासाठी ओळखला जातो तितकी नव्हती. स्टोक्सने १० डावात २३६ धावा केल्या आणि फक्त ४ विकेट घेतल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा मोईन अली आणि राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर हे दोनच खेळाडू आहेत जे आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी कायम ठेवण्यात आले आहेत.

स्टोक्सने २००९ मध्ये ओव्हल येथे डरहमसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या वर्षी तो बांगलादेशच्या अंडर-१९ संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळला होता. २०१९ अंडर-१९ विश्वचषकासाठी स्टोक्सची निवड झाली होती. त्याचे प्रथम श्रेणी पदार्पण मेरीलेबोन क्रिकेट क्लबविरुद्ध केले होते. त्याच वर्षी त्याने डरहमसाठी एसेक्सविरुद्ध चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले होते. त्याने नॉटिंगहॅमशायरविरुद्ध पहिले प्रथम श्रेणी शतक झळकावले होते. जानेवारी २०१५ मध्ये, बेन स्टोक्स बिग बॅश लीगमधील मेलबर्न रेनेगेड्स संघाचा भाग बनला होता.

स्टोक्सने २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्याची पुढील एकदिवसीय मालिका भारताविरुद्ध होती. २०१२ मध्ये तो इंग्लंडकडून खेळला नव्हता. २०१४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्टोक्सची पुन्हा संघात निवड झाली होती. त्याच वर्षी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी स्टोक्सची निवड झाली. दोन सामन्यांनंतर त्याला वगळण्यात आले होते पण शेवटच्या सामन्यात त्याला परत बोलावण्यात आले होते. त्या सामन्यात त्याने ३३ धावा केल्या आणि तीन विकेट घेतल्या होत्या.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप