बप्पी लहरी यांच्या अंगावरील सोन्याचे आता काय होणार? त्यांचे दागिने शेवटी वापरणार तरी कोण? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे!!

भारतातील संगीत क्षेत्राला या एकाच महिन्यात दोन मोठे हादरे बसले आहेत, जणू भारतीय संगीत क्षेत्रातले दोन अस्सल हिरे निखळून पडले आहेत! एकाच महिन्यात संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे निधन होऊन एक आठवडा ही पूर्ण झाला नाहीये, तोच संगीत प्रेमींना हादरवणारी दुसरी घटना झाली आहे! आपल्या सगळ्यांचे लाडके स्टार बप्पी लहरी यांनी देखील या जगातून सर्वांचा अखेरचा निरोप घेतला आहे. संपूर्ण भारत या दोघांच्याही निधनाने शोकमय झालेला असून अतीव दुःखात बुडाला आहे.

बप्पी लहरी यांचे आता निधन झाल्यामुळे त्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्नांवर चर्चा घडताना आता दिसत आहेत. बप्पी लहरी जे अंगावर सोन्याचे दागिने घालायचे त्या दागिन्यांचं आता पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हे दागिने आता पुढे जाऊन कोण वापरणार? याचे उत्तर देखील आता मिळाले आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचत रहा!

८० ते ९० च्या दशकातील एक सदाबहार आवाज म्हणून बप्पी लहरी यांच्या आवाजाने आणि त्यांच्या सुरेल गाण्यांनी वेगळाच नावलौकिक मिळवला आहे. त्या नव्वदीच्या पिढीपासून ते आत्ताच्या पिढीपर्यंत अजूनही सर्वचजण त्यांचा आवाज अगदी आनंदाने एन्जॉय करताना दिसतात. आवाजा शिवाय त्यांच्या अंगावर दागिने घालण्याच्या अनोख्या स्टाईल वरून देखील ते जगप्रसिद्ध होते!

सर्वजण त्यांना कौतुकाने इंडियन गोल्डमॅन असे देखील म्हणायचे. बप्पीदा यांना लहानपणापासूनच सोन्याचे दागिने घालण्याचा विशेष शौक होता. तसेच ‘सोन्याचे दागिने घालायला लागल्या पासून माझे संगीत क्षेत्रातील करियर देखील झळाळून उठले आहे’ असा त्यांचा समज होता.

म्हणून तेव्हापासून ते सोन्याच्या दागिन्यांचे विशेष शौकीन झाले आणि आपल्या पेहरावात देखील त्यांनी सोन्याच्या दागिन्यांचा समावेश केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बप्पीदा आपल्या सोन्याला विशेष काळजीने जपायचे आणि अगदी सुरक्षित ठेवायचे. मीडिया प्रतिनिधींशी बोलताना त्यांच्याबद्दलची एक आठवण शेयर करताना त्यांच्या एका मित्राने असे सांगितले की,

“बप्पीदा यांचे आणि सोन्याचे एक विशेष नाते होते, त्यांनी मिळवलेली हीच ओळख आणि सोन्याशी जोडल्या गेलेले त्यांचे हे नाते हेच शेवटपर्यंत कायम राहावे अशी त्यांची इच्छा होती, ते नेहमी अशा पेहरावा मध्ये अगदी आनंदी असायचे”

आता बप्पीदा यांच्या निधनानंतर त्यांचे हे सोन्याचे दागिने कोण वापरणार? याबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोन्याचे दागिने असलेल्या बप्पी दांकडे सोन्याची चेन, सोन्याच्या अंगठ्या, कडे, देव-देवतांचे लॉकेट जाड गोफ अशा सर्व प्रकारच्या दागिन्यांचा समावेश होता. आता सध्या तरी हे दागिने तिजोरीत ठेवलेले असून त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात आहेत.

कोरोनाची लागण झाल्यापासून बप्पीदा गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. कोरोनातुन ते बरे देखील झाले होते आणि पुन्हा आपल्या घरी देखील गेले होते! परंतु काही काळाने पुन्हा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी ते पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि अखेर हॉस्पिटलमध्येच त्यांचे निधन झाले वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेत सगळ्या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे एवढं मात्र खरं!

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप