टीम इंडियाला हरवण्यासाठी बावुमाने हा स्फोटक खेळाडू आपल्या संघात सामील केला होता, विजयानंतर केला खुलासा..!

पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T-२० सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेने ४ विकेटने पराभव केला. कटक येथील बाराबती स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडिया ने २० षटकात ६ विकेट गमावत १४८ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिके ने १४९ धावांचे लक्ष्य १८.२ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले होते. यासह दक्षिण आफ्रिके ने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिके च्या विजया नंतर संघाचा कर्णधार टेंबा बावुमा काय म्हणाला ते जाणून घेऊया.

भारता विरुद्ध (IND vs SA) सलग दुसऱ्या विजया नंतर टेंबा बावुमा म्हणाला की, या लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होते. त्याने भुवनेश्वर कुमार च्या गोलंदाजी चे कौतुक केले. भुवीने चांगली गोलंदाजी केली, हा सामना पुढे नेण्या साठी आम्हाला खरोखर कोणाची तरी गरज होती. म्हणून मी माझा खेळ खेळला होता. मी खेळात हीच खेळ पुढे नेहण्याची भूमिका निभावतो. मी या खेळातून धडा घेऊ शकतो, पुढच्या सामन्यात आणखी चांगला प्रयत्न करेन.

आम्हाला माहित होते की हे सोपे लक्ष्य नसेल, परंतु आम्हाला आत्मविश्वास होता. आम्हाला माहित होते की आम्हाला आमच्या योजना अंमलात आणायच्या आहेत. आम्ही मिलरला ५ किंवा ६ वर वापरू शकतो. क्लासेन अशी व्यक्ती आहे जी दोन चेंडूं मध्ये मोठे फटके खेळू शकते. क्लासेन आमच्या फलंदाजीचा मजबूत आधारस्तंभ आहे. तुमची भूमिका कोणतीही असो, ती तुम्हाला शक्य तितक्या चांगल्या प्रकारे बजावायची आहे.

टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकातच बाद झाला होता. यानंतर सातव्या षटकात इशान किशनही पॅव्हेलियन मध्ये परतला होता. १० व्या षटकात ऋषभ पंत बाद झाला होता. १३ व्या षटकात हार्दिक पांड्या बाद झाला होता. १४ व्या षटकात श्रेयस अय्यर बाद झाला होता. अक्षर पटेल १७ व्या षटकात बाद झाला होता. आफ्रिकन संघात दोन बदल करण्यात आले होते. क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्स जखमी झाले आहेत. टीम इंडियात कोणताही बदल केला न्हवता.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप