BCCI ची महिला IPL बाबत मोठी घोषणा, पुढील वर्षी ६ संघांसह सुरु होणार महिला IPL..!

तुम्ही अनेक वर्षांपासून महिला आयपीएल बद्दल ऐकले असेल, त्याच्या मंजुरी बाबत काही माहिती BCCI ने दिली न्हवती, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बीसीसीआयने महिला आयपीएल ला ग्रीन सिग्नल दिला आहे. आयपीएल २०२२ सुरू होण्याच्या एक दिवस आधी, शुक्रवार, २५ मार्च रोजी मुंबईत झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी महिला आयपीएल सुरू करण्याबाबत चर्चा केली होती, ज्यातून असा निष्कर्ष काढण्यात आला की दरवर्षी महिला आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याची गरज आहे.

बातमीवर विश्वास ठेवला तर पुढील वर्षी ६ संघांसह महिला आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. बीसीसीआय ने ही स्पर्धा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे आणि २०२३ मध्ये ती सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न करू असे सांगितले आहे. क्रिकबझ वेबसाइटनुसार, महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठी संघ निवडीचा पहिला प्रस्ताव केवळ विद्यमान आयपीएल फ्रँचायझींनाच दिला जाईल. सध्या या हंगामात बीसीसीआयने आयपीएल मधील संघांची संख्या ८ वरून १० केली आहे. अशा परिस्थितीत बोर्ड या फ्रँचायझीं समोर महिला संघ तयार करण्याचा प्रस्ताव देऊ शकते. जर ते पूर्ण पणे यशस्वी झाले नाही, तर बोर्ड फ्रँचायझीं साठी नवीन अर्ज आमंत्रित करेल.

यासह बोर्डाने ठरवले आहे की महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा यावर्षी पुन्हा परतणार आहे. ही तीन संघांची स्पर्धा २०१९ मध्ये सुरू झाली, जी आयपीएल च्या प्लेऑफ सामन्या दरम्यान खेळली गेली होती.

आता या मोसमाचे आयोजन मे महिन्यात प्लेऑफ सामन्यांच्या आसपास केले जाईल. या स्पर्धे साठी प्रायोजकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे महिला आयपीएलची वेगळी आणि मोठी स्पर्धा सुरू होण्यासही चालना मिळाली असल्याचे मंडळाचे मत आहे. १५ वर्षां पूर्वी जगातील पहिली आणि सर्वात यशस्वी T-२० लीग सुरू करणाऱ्या बीसीसीआय ने महिलांच्या स्पर्धे बाबत फार पूर्वी पासून उदासीनता बाळगली आहे. आयपीएल नंतर सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया च्या बिग बॅश लीग आणि इंग्लंड च्या टी-२० ब्लास्ट आणि द हंड्रेड सारख्या लीग मध्ये ही महिलांच्या स्पर्धा खेळवल्या जात आहेत.

त्याच वेळी, काही महिन्या पूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने महिला पीएसएल सुरू करण्याच्या निर्णया मुळे बोर्डावर सतत दबाव आणणाऱ्या बीसीसीआय समोर महिलांच्या आयपीएलची मागणीही तीव्र झाली होती. त्याच वेळी, या वर्षी कॅरेबियन प्रीमियर लीगसह ३ संघांच्या महिला सीपीएलच्या परिचयाने बीसीसीआयला कठीण परीस्थितीत आणले आहे. काही महिन्या पूर्वी बीसीसीआय महिला आयपीएल बाबत गंभीर दिसत नव्हते आणि बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गेल्या महिन्यातच एका मुलाखतीत सांगितले होते की, देशातील महिला क्रिकेटपटूंचा समूह जसजसा वाढत जाईल तसतसे बोर्ड मोठ्या आणि अधिक विस्तृत स्पर्धे मध्ये उतरेल. आता एकाच महिन्यात ६ संघांसह स्पर्धा सुरू करण्यासाठी क्रिकेट बोर्ड सज्ज झाले आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप