‘आशिकी २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्याच्या घडीला आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पण, अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ती एक वेगळच काम करत होती. बऱ्याच बी टाऊन कलाकारांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचं प्रोफेशन वेगळं असल्याचं आपण पाहिलं आहे. श्रद्धाही त्यापैकीच एक. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ती बोस्टनमध्ये एका कॉफी शॉपमध्ये काम करत होती. तुमचाही विश्वास बसत नाहीये ना, पण हे खरं आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आज प्रत्येक तरुणाईच्या गळ्याची ताईत बनली आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण करण्यात तिने अल्पावधीतच यश मिळवले आहे. आता ही अभिनेत्री आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने श्रद्धाबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या काही नवीन गोष्टी आपण या लेखातून जाणून घेऊया, यासाठीच हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा!
श्रद्धा कपूर चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी एका कॉफी शॉपमध्ये काम करत होती. खरतर अशक्य वाटणारी गोष्ट आहे ही.. तुम्हालाही वाचून वाटलं ना आश्चर्य? पण हे खरं आहे!
काही दिवसांपूर्वी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धाने या माहितीचा खुलासा केला होता. श्रद्धा शिक्षणासाठी बोस्टनला राहत होती तेव्हा त्याठिकाणी ती एका कॉफी शॉपमध्ये काम करायची. याबद्दल ची आठवण सांगताना श्रद्धा म्हणते की, ‘जबाबदारी ची जाणीव व्हावी, स्वतः च्या पायावर उभं राहावं आणि स्वतः च्या खर्चासाठी जास्तीचे पैसे मिळावे म्हणून मी त्यावेळी काम करण्याचा निर्णय घेतला होता’.
View this post on Instagram
श्रद्धा कपूर म्हणजे बॉलिवूड मध्ये आपल्या खतरनाक खलनायकी भूमिकेतून छाप पडणारे, दिगग्ज अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी आहे. श्रद्धाची गणना आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणून करण्यात येते. आतापर्यंतचे तिचे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरले आहेत. आगामी काळात श्रद्धा कोस्टार रणबीर कपूरसोबत एका सिनेमातून झळकताना दिसणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कलाकारांच्या सान्निध्यात वावरलेली आणि कलाविश्वाला जवळून पाहिलेली श्रद्धा शिक्षणाच्या निमित्ताने काही वर्षे बोस्टनमध्ये होती. शिक्षण सुरु असतानाच तिने काम करण्याचा निर्णय घेतला होता. काम करुन स्वावलंबी होण्यासाठी आणि हातात चार पैसे यावेत यासाठी तिने हे काम करण्याचा निर्णय घेतला होता. श्रद्धाचे हे अनोखे रूप सगळ्यांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का देणारे ठरले आहे.
श्रद्धाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर. ‘आशिकी २’ या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली होती. पदार्पणाच्या चित्रपटातच श्रद्धाचा हा परफॉर्मन्स पाहता तिच्याकडून असणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत.