आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला होणार आहे पण या लिलावात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी त्यांची नावे दिलेली नाहीत म्हणजेच ते पुन्हा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. या खेळाडूंमध्ये ख्रिस गेलचेही नाव आहे.
मेगा लिलावासाठी एकूण १२१४ क्रिकेटपटूंनी त्यांची नावे नोंदवली आहेत, ज्यात ३१२ अनकॅप्ड आणि २७० कॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. युनिव्हर्स बॉस या नावाने प्रसिद्ध असलेल्या गेलने आगामी लिलावासाठी आपले नाव दिलेले नाही आणि त्यामुळेच चाहते निराश झाले आहेत.
लिलावात गेलचे नाव न आल्याचा अर्थ असा आहे की तो यापुढे आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने फार पूर्वीच सांगितले होते की, तो यापुढे आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. गेल आणि डिव्हिलियर्सच्या अनुपस्थितीमुळे चाहते निराश झाले असून हे वातावरण सोशल मीडियावर स्पष्टपणे दिसून येत आहे.
ख्रिस गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने आयपीएलच्या ११२ सामन्यांमध्ये २९२ षटकार ठोकले आहेत. कोणत्याही खेळाडूला त्याच्या विक्रमाच्या जवळ जाता आलेले नाही. सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने आयपीएलच्या १४१ सामन्यांमध्ये १८६ षटकार ठोकले आहेत. सर्वाधिक जलद शतक करण्याचा विक्रमही ख्रिस गेलने आपल्या १७५ धावांच्या खेळीत केला होता. ही खेळी खेळण्यासाठी गेलला ६६ चेंडूंचा सामना करावा लागला असला तरी त्याने अवघ्या ३० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले होते. क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने वनडेतील सर्वात जलद शतक झळकावले होते. त्याने २०१५ साली अवघ्या ३१ चेंडूत शतक झळकावले होते.
प्रत्येक आयपीएल हंगामात किमान एक सामना खेळणारा एबी डिव्हिलियर्स हा एकमेव परदेशी खेळाडू आहे. आत्तापर्यंत असे फक्त १२ खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएलच्या १३ हंगामात किमान एक सामना खेळला आहे परंतु एबी डिव्हिलियर्स वगळता ते सर्व भारतीय खेळाडू आहेत. त्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध १३३* च्या सर्वोत्कृष्ट धावासहित १८४ सामन्यांमध्ये ५१६२ धावा करून सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून आयपीएल कारकिर्दीचा शेवट केला आहे. पण या सर्व पराक्रमांशिवाय एबीडीच्या नावावर एक ऐतिहासिक रेकॉर्ड आहे जो कोणत्याही परदेशी खेळाडूच्या नावावर नाही.