IPL २०२२ सुरू होण्यापूर्वीच लखनऊच्या टीमला लागला मोठा झटका, या मोठ्या खेळाडू शिवाय टीम कशी खेळणार..!

मित्रांनो, २६ मार्चपासून आयपीएल बघायला मिळणार आहे. ज्याच्या तयारीत सर्वजण व्यस्त आहेत. तुम्हाला माहिती आहेच की, यावेळी दोन नवीन संघ आयपीएल मध्ये खेळताना दिसणार आहेत. यापैकी एक संघ लखनौ सुपर जॉइंट्स आहे. लखनौचा संघ आयपीएल मध्ये नव्या पद्धतीने पदार्पण करताना दिसणार आहे. या संघाच्या चाहत्यांना मैदानात खेळताना पाहण्याची उत्सुकता लागली आहे. मात्र संघातील काही खेळाडू मुळे संघ व्यवस्थापना समोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी ३ सामन्यांच्या मालिकेसाठी १६ सदस्यांचा संघ निवडला आहे. ही मालिका १८ ते २३ मार्च दरम्यान पाहायला मिळणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाच्या घोषणेने आता अनेक आयपीएल संघ नाराज झाले आहेत. याचा अर्थ, क्वारंटाइनच्या नियमांचे पालन न केल्या मुळे, काही खेळाडूंना आयपीएलच्या सुरुवातीला सामने खेळणे खूप कठीण झाले आहे.

यानंतर दक्षिण आफ्रिकेला दोन कसोटी सामने खेळायचे आहेत, जे १२ एप्रिलपर्यंत पाहायला मिळनार आहेत. या बांगलादेश दौऱ्याचा परिणाम आयपीएलच्या अनेक संघांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. परंतु, आयपीएलसाठी जाणारे खेळाडू बांगलादेश विरुद्धच्या दोन विश्वचषक कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्यासाठी उपलब्ध होतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपासून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोरखिया ​आफ्रिकेसाठी खेळला नाही, तो उपलब्ध नाही कारण तो हिपच्या दुखापतीनंतर रिहैबिलिटेशन मध्ये आहे आणि त्याच्यासाठी सुरुवातीच्या कसोटी आणि आयपीएलमध्ये खेळणे कठीण होईल असे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Quinton De Kock (@qdk_12)

भारतासोबत खेळणाऱ्या या दक्षिण आफ्रिका संघाबद्दल बोलायचे झाले तर त्यात काही बदल पाहायला मिळाले आहेत. ज्यामध्ये संघाचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाला संघातून वगळण्यात आले होते. याचे कारण म्हणजे तो त्याची फिटनेस टेस्टही करू शकला नाही. आयपीएलचे काही दिग्गज म्हणजे क्विंटन डी कॉक, मार्को जेन्सन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा आणि रस्सी व्हॅन डर डुसेन. यांचा दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, जॉन्सन, मार्कराम, एन्गिडी, रबाडा आणि व्हॅन डर ड्युसेन कसोटी सामन्यात खेळताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. जर फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉक सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.

यावर्षी क्विंटन डी कॉक नवीन आयपीएल संघ लखनऊसोबत खेळताना दिसणार आहे. कारण मेगा लिलावादरम्यान लखनऊने क्विंटनचाही संघात समावेश केला होता. गेल्या आठवड्यात कसोटी कर्णधार डीन एल्गरने सांगितले होते की, तो खेळाडूंना त्यांच्या कमाईऐवजी त्यांच्या देशाला गौरव देण्यास सांगितले होते. पण आता खेळाडू कशी कामगिरी करतील, हे नंतरच कळेल.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप