भारतात कोणताच असा सिलेक्टर नाही जो कोहली ला टीम मधून बाहेर काडू शकतो..!

विराट कोहलीला संघातून वगळू शकेल असा कोणताही निवडकर्ता भारतात जन्माला आला नाही, असे पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफ यांनी म्हटले आहे. खरंतर विराट कोहली खूप खराब फॉर्ममधून जात आहे पण त्याला सतत संधी मिळत आहेत. कोहलीने भूतकाळात जे काही केले तेच त्याला टीम इंडियात स्थान मिळवून देण्यासाठी पुरेसे असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. संघ व्यवस्थापनाचा विश्वास जिंकूनही विराटला सध्या त्याचा जुना फॉर्म परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व काही करूनही जुन्या फॉर्म मध्ये परत येण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे दिसते.

2022 मध्ये कोहलीची तिन्ही फॉरमॅटमध्ये सरासरी 25.50 आहे, ही कॅलेंडर वर्षातील त्याची सर्वात कमी सरासरी आहे. भारताच्या माजी कर्णधार विराट ने  14 जुलै रोजी लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 16 धावा केल्या. याआधी T20I मालिकेत, त्याने दोन सामन्यांमध्ये 1 आणि 11 धावा केल्या कारण तो त्याच्या फॉर्म शी झगडताना दिसत आहे. कोहलीला संघातून वगळण्याबाबत विचारले असता रशीद लतीफ ‘कॉट बिहाइंड’ या यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना म्हणाला, ‘विराट (कोहलीला) वगळणारा निवडकर्ता भारतात जन्माला आलेला नाही.’

कोहलीच्या प्रत्येक अपयशावर खूप प्रशचिन्ह उपस्तित होत आहे कोहली शतका साठी तरसताना  दिसत आहे कारण त्याने नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. गुरुवारी ते पुन्हा फलंदाजीत योगदान देऊ शकला नाही. स्थिती इतकी वाईट आहे की कोहलीच्या प्रत्येक अपयशावर कोणीही टीका टिप्पणी करताना दिसत आहे, त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही ट्विटरवर विराट ला पाठिंबा दर्शवाताना दिसला . बाबर यांनी ट्विट केले की, “हेही दिवस जातील. मजबूत रहा. विराट कोहली.”

लॉर्ड्सवरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जोस बटलरने प्रथम फलंदाजी करत एकूण 246 धावा केल्या. मोईन अली आणि डेव्हिड विली यांच्या कामगिरीमुळे इंग्लंडने 87 धावांत चार गडी गमावल्यानंतर सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली. लेग-स्पिनर युझवेंद्र चहल हा भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वोत्कृष्ट होता कारण त्याने दहा षटकांत ४७ धावांत चार बळी घेतले.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप