भारताचा 5 विकेट्सने दारून पराभवानंतर रोहित शर्मा ने धरले खेळाडूंना जवाबदार..!

 काल,भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला, ज्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने चमकदार कामगिरी करत 5 विकेट्सने शानदार विजय नोंदवला. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरली होती आणि 138 धावा करूनच ढेपाळली. भारताकडून एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा स्वतः खाते न उघडता बाद झाला.

लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने टीम इंडियाने दिलेले 139 धावांचे लक्ष्य 4 चेंडू बाकी असताना 5 गडी गमावून पूर्ण केले. वेस्ट इंडिज संघाने ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली आहे. ओबेद मकाऊच्या शानदार गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यात ओबेद मकाऊने 4 षटकात केवळ 17 धावा देत 6 बळी घेतले. त्याने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांना आपले शिकार बनवले.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

भारतीय गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांपेक्षा वाईट कामगिरी केली. शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी 10 धावांची गरज होती. मात्र आवेश खानच्या खराब गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने अवघ्या 2 चेंडूत 10 धावा केल्या.

पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?: भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा थोडा निराश दिसत होता आणि तो खेळाडूंवर नाराज होता. सामन्यानंतरच्या परिषदेत टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही चांगली फलंदाजी केली नाही आणि पुरेशा धावा केल्या नाहीत. खेळपट्टीवर असे काहीही नव्हते, आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. पण मी याआधीही म्हटलं आहे की, जर आपण फलंदाजी युनिट म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असू तर काही वेळा चूक होऊ शकते. आम्ही आमच्या चुकांवरसुधारू  आणि त्यांच्यातुन शिकू.

मला आवेशला २० वे षटक टाकण्याची संधी द्यायची होती कारण आमच्याकडे भुवनेश्वर होता, पण जर तुम्ही आवेश किंवा अर्शदीपला संधी दिली नाही तर ते पूर्णपणे चमकू शकणार नाहीत. त्याने आयपीएलमध्ये ही कामगिरी केली होती. हा फक्त एक खराब सामना आहे आणि आम्हाला घाबरण्याची गरज नाही. मला या संघाचा अभिमान आहे. एवढ्या कमी धावसंख्येमुळे सामना 13 किंवा 14 षटकांत संपुष्टात आला असता पण तो शेवटच्या षटकापर्यंत गेला. आम्ही शेवटपर्यंत लढणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मी माझ्या गोलंदाजीवर आनंदी आहे पण फलंदाजीत मला काही गोष्टी दुरुस्त कराव्या लागतील.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप