भारतीय संघाला मोठा धक्का, एजबॅस्टन कसोटीतून रोहित शर्मा बाहेर, बुमराह सांभाळणार कर्णधारपद..!

इंग्लंड दौऱ्या वर पोहोचलेल्या टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एजबॅस्टन कसोटीतून वगळण्यात आले आहे. आता त्याच्या जागी टीम इंडियाचे कर्णधार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ला पाहणार आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थे नुसार, रोहित शर्मा दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. अशा स्थितीत त्याला एजबॅस्टन कसोटीत खेळणे अशक्य असल्याने जसप्रीत बुमराहला कर्णधार पद देण्यात आले आहे. गेल्या वर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. त्यानंतर कोरोना प्रकरणां मुळे पाचवा टेस्ट होऊ शकला न्हवता, जी आता खेळली जाणार आहे. सध्या भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी कायम ठेवली आहे.

भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील हा पाचवा कसोटी सामना १ जुलै पासून बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. यानंतर रोहित शर्माचे पुनरागमन झाले तर त्याला त्याच्या नेतृत्वा खाली तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय मालिका खेळायची आहे. कसोटी सामन्या साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे आणि टी-२० मालिके साठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.

टीम इंडियाचे कर्णधार असताना रोहित शर्माने अलीकडेच इंग्लिश क्लब लीसेस्टरशायर विरुद्ध सराव सामना खेळला होता. सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा संघासोबत दिसला नाही. त्याने फलंदाजीही केली नाही. त्यानंतर बातमी आली की रोहित कोविड पॉझिटिव्ह झाला आहे. तेव्हा पासून रोहित आयसोलेशन मध्ये आहे. कव्हर म्हणून मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे.

कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ:
जसप्रीत बुमराह (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेट कीपर), केएस भरत (विकेट कीपर), मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप