गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली आहे. या पंधराव्या हंगामात वेगवेगळ्या टीम मधील प्लेऑफची स्पर्धा आता अधिक चुरशीची बनलेली दिसत आहे. या सामन्यात गुजरात, लखनऊ या टीमनी आपले आयपीएल मधील स्थान जवळपास निश्चित केल्यात जमा आहे. आयपीएलच्या मॅच मध्ये आतापर्यंत ४ आणि ५ ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई आणि मुंबई या दोन टीम यंदा मात्र या स्पर्धेत कुठेच दिसत नाहीयेत. परंतु आता खेळामध्ये आगामी सामन्यांत उर्वरित टीम कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.
View this post on Instagram
गेली काही वर्षे आयपीएल च्या ट्रॉफी स्वतःच्या टीमच्या नावे करणाऱ्या काही टिम्स यंदा शेवटच्या थरावर आहेत. तसेच आयपीएलमध्ये आतापर्यंत ४ आणि ५ ट्रॉफी जिंकून आयपीएल चे सामने गाजवणाऱ्या चेन्नई आणि मुंबई टीम यंदा मात्र या स्पर्धेत कुठेच दिसत नाहीयेत. तर या उलट पंजाब टीमने बंगळुरू विरुद्धचा सामना जिंकून संघाची प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळवली आहे.
यावेळी पंजाब विरुद्ध सामना खेळात हारल्या नंतर बंगळुरू टीमचं प्लेऑफमध्ये पोहोचणं कठीण बनलं आहे. टीमचा हा १३ व्या सामन्यात ६ वा पराभव झालेला आहे. पंजाब टीमकडे आता एकूण १४ गुण आहेत, तर हैदराबाद टीमकडे १० पॉईंट्स जमले आहेत. त्यामुळे आगामी आणखी दोन सामन्यांनंतरच प्लेऑफचं चित्र आपल्या सगळ्यांसमोर अधिक रित्या सुस्पष्ट होईल अशी आशा क्रिकेटप्रेमींना लागली आहे.
View this post on Instagram
यावेळी आयपीएल मध्ये सगळ्यात प्रथमस्थान पटकवण्याचा मान गुजरात संघाला मिळाला आहे. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी खेळत पॉईंट टेबलवर १६ गुण मिळवत गुजरात टीमला पहिल्या स्थानावर टिकून राहण्यात यश मिळाले आहे. तर लखनऊ संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आणि तिसऱ्या स्थानावर राजस्थान टीम आहे. चौथ्या स्थानावर बंगळुरू टीम आहे. दिल्ली, पंजाब, हैदराबाद ,लखनऊ, राजस्थान टीम हे सर्व संघ अगदी सहजपणे प्लेऑफ स्पर्धे पर्यंत पोहोतील अशी सर्व क्रिकेट रसिकांना आशा आहे. या सर्वांमुळेच आता आयपीएल च्या शेवटच्या पर्वात प्ले ऑफ मध्ये कोणता संघ समाविष्ट होणार आणि ती तिसरी टीम कोणती असणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. अत्यंत चुरसीचे ठरलेले हे आयपीएल मधील सामने पाहणे आता तितकेच रोमांचक ठरणार आहेत एवढं नक्की!