नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नवीन राजवाड्यासमोर बॉलिवूड स्टार्स चे बंगले ही पडतील फिके, पहा त्याचा आलिशान राजवाडा!

१९९९ साली प्रदर्शित झालेल्या सरफरोश चित्रपटात एक छोटी भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी स्वतःच्या हिंमतीवर आज यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला आहे! सुरुवातीला नाटकातून छोट्या-मोठ्या भूमिका करणारा नवाजुद्दीन हळूहळू प्रयत्न करत, हार न मानता चित्रपटातून छोटे-मोठे रोल करत झळकत राहिला.

कहानी ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर गॅंग्ज ऑफ वासेपूर, तलाश, किक इत्यादी चित्रपटांत दमदार भूमिका साकारत नवाजुद्दीन यशाच्या एक एक पायऱ्या चढतच राहिला. आणि या नंतर त्याच्या या अभिनयाच्या प्रवासात मानाचा शिरपेच रोवल्या गेल्या! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ठाकरे या सिनेमात स्वतः बाळासाहेबांची भूमिका त्याच्या वाट्याला आली आणि यात त्याने अक्षरशः जीव ओतून काम केले आणि मिळालेल्या संधीचे सोने केले! ही भूमिका, तो चित्रपट सगळं काही देशभर गाजलं!

आज नवाजुद्दीन सिद्दीकीला कोण ओळखत नाही? छोट्या शहरातून आलेल्या या सामान्य चेहऱ्याच्या मुलाने आज बॉलिवूडमध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मुंबईत त्याचा राजवाड्यासारखा स्वप्नांचा सुंदर बंगला उभा आहे.! सिनेवर्तुळात सध्या त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

नवाजने त्याच्या बंगल्याचं नुकतंच नुतनीकरण केलेलं आहे . यासाठी त्याला ३ वर्ष लागलीत. वडिलांच्या समर्थनार्थ नवाजने आपल्या या बंगल्याला ‘नवाब’ असं नाव दिलं आहे. त्याच्या या पांढऱ्या शुभ्र लक्झरी मेन्शनमधील भव्य व्हरांडा, मोठा टेरेस सगळंच काही अप्रतिम आणि बघण्यासारखं आहे.

नवाजच्या या बंगल्याची तुलना आता थेट शाहरूख खानच्या ‘मन्नत’शी होतेय. इंडस्ट्रीत नवाजने सुरुवातीपासून प्रचंड स्ट्रगल केला आहे. आज त्याच्याकडे असलेला हा अलिशान बंगला, त्याचं यश सगळं काही याच कष्टाचं प्रतीक आहे! आज त्याच्याकडे मेहनतीने मिळवलेली कोट्यावधीची संपत्ती आहे.

१९९९ साली नवाजुद्दीन ‘सरफरोश’ या सिनेमात एका छोट्याशा भूमिकेत दिसला होता. तेव्हा त्याच्याकडे कुणाचं फारसं लक्षही गेलं नव्हतं. गावात वॉचमन ते बॉलिवूडचा यशस्वी स्टार हा त्याचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवाजची एकूण संपत्ती सुमारे १५० कोटींच्या घरात आहेत. दर महिन्याला तो सुमारे १ कोटींची कमाई करतो. नवाज एका सिनेमासाठी सुमारे ६ कोटी रूपये घेतो तर ब्रँडच्या प्रमोशनसाठी सुमारे १ कोटींपर्यंत फी आकारतो.

चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत आपला भन्नाट अभिनयाने यशाचे शिखर गाठणारा नवाजुद्दीन आज अलिशान आयुष्य जगताना दिसतो. अर्थात आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत, कोणत्याही बाबतीत त्याला गर्व झालेला नाहीये. त्याच्या गावातील घरी वषार्तून एकदा तो नक्की जातो. तिथं शेतात साधारण माणसासारखं कामही अगदी आवडीने करतो. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात नवाजुद्दीन गावातील छोट्याशा घरात अनेक महिने मुक्कामाला केला होता.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप