कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीला दिले विजयाचे संपूर्ण श्रेय, भारताला मिळाला हार्दिक पांड्या पेक्षा चांगला आलराउंडर..!

तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ८ धावांनी पराभव केला होता. यासह भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्ड ने नाणे फेक जिंकून गोलंदाजी चा निर्णय घेतला होता. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकात ५ विकेट गमावत १८६ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ २० षटकात ३ बाद १७८ धावाच करू शकला होता.

सामन्यानंतर झालेल्या संभाषणात कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, या सामन्यात प्रत्येकाने खूप चांगली कामगिरी केली व महत्त्वाचे योगदान दिले. पुढे तो म्हणाला, जेव्हा तुम्ही या संघा विरुद्ध खेळता तेव्हा ते नेहमीच भीतीदायक असते. आम्हाला माहित होते की ते थोडे कठीण असेल, पण आम्ही खूप चांगली तयारी केली होती. अनुभव ने चांगली भूमिका बजावली होती. तो यॉर्कर्स आणि बाउन्सरला चांगली फलंदाजी करत होता. त्याच्या प्रतिभेवर आमचा विश्वास आहे. विराटसाठी ही अत्यंत महत्त्वाची खेळी होती. त्याने माझ्या वरील दबाव दूर केला. पंत आणि अय्यर यांनी ही शानदार खेळ केली होती.

रोहित शर्माने व्यंकटेश अय्यरचे कौतुक करताना सांगितले की, त्याची प्रगती कशी झाली हे पाहून खूप आनंद झाला. अशी परिपक्वता पाहून खूप छान वाटतं. तो त्याच्या कौशल्याचा आधार घेतो आणि प्रत्येक कर्णधाराला तेच हवे असते. आम्हाला आमच्या टीम मध्ये अशा पात्रांची गरज आहे.

भारताकडून विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी अर्ध शतके झळकावली होती. व्यंकटेश अय्यर सह पंतने पाचव्या विकेट साठी ३५ चेंडूत ७६ धावांची भागीदारी केली होती. व्यंकटेश अय्यर १८ चेंडूत ३३ धावा काढून बाद झाला होता, त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार मारला होता. ऋषभ पंत २८ चेंडूत ५२ धावा करून नाबाद राहिला होता. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला होता. भारताकडून भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती.

वेस्ट इंडिज कडून रोव्हमन पॉवेलने ३६ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले होते. पूरन ४१ चेंडूत ६२ धावा करून बाद झाला होता. त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले होते. रोस्टन चेस त्यांच्या कडून सर्वात यशस्वी ठरला. त्याने ४ षटकात २५ धावा देत ३ बळी घेतले होते. रोमारियो शेफर्ड आणि शेल्डन कॉट्रेल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळविले होते.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप