CSK ने इंस्टाग्राम वर जडेजाला अनफॉलो केले, CSK च्या CEO ने केले धक्कादायक विधान..!

इंडियन प्रीमियर लीगचा ४ वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज सध्या अंतर्गत प्रकरणा मुळे अडकला आहे. चेन्नई सुपर किंग्ज ची या मोसमात अत्यंत खराब कामगिरी झाली आहे. या खराब कामगिरी च्या पार्श्‍व भूमी वर या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज चा कर्णधार असलेला रवींद्र जडेजा संपूर्ण मोसमातून बाहेर झाला आहे. रवींद्र जडेजा च्या बरगडीला दुखापत झाली असल्या मुळे त्याला या मोसमातील उर्वरित सामन्या मधून घरी परतावे लागले आहे. पण यात असे अनेक ट्विस्ट आहेत, जे चेन्नई सुपर किंग्ज मध्ये सर्व काही ठीक नसल्याचे दर्शवत आहेत.

या मोसमा च्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्ज ने रवींद्र जडेजाला त्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. जडेजा कर्णधार म्हणून पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि ८ सामन्यांत कर्णधारपद भूषवल्या नंतर त्याला माघार घ्यावी लागली आणि महेंद्रसिंग धोनी पुन्हा कर्णधार झाला.

रवींद्र जडेजा ने पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज मध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळण्यास सुरुवात केली होती, परंतु यादरम्यान त्याला शेवट च्या सामन्यात दुखापती मुळे बाहेर राहावे लागले आहे, त्यानंतर अचानक रवींद्र जडेजाला CSK ने त्यांच्या इंस्टाग्राम वर अनफॉलो केले आहे. त्यामुळे जडेजाने ही CSK ला अनफॉलो केले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज ने रवींद्र जडेजा बाबत अधिकृत माहिती दिली आहे की दुखापती मुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे, मात्र सूत्रा वर विश्वास ठेवायचा झाल्यास रवींद्र जडेजा ला संघातूनच वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याचेच एक कारण त्याला ट्विटर वर अनफॉलो करणे देखील आहे.

चेन्नई सुपर किंग्ज चे सीईओ काशी विश्वनाथ याने आता या प्रकरणा वर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  ज्या मध्ये त्याने स्पष्ट पणे म्हटले आहे की, तो या प्रकरणा कडे फारसे लक्ष देत नाही. मला इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या गोष्टीं बद्दल काहीच माहिती नाही आणि मी तुम्हाला त्या बद्दल अधिक सांगू शकत नाही. दुखापती मुळे रवींद्र जडेजा स्पर्धे तून बाहेर पडल्या बद्दल काशी विश्वनाथ पीटीआयशी बोलताना म्हणाला, रवींद्र जडेजा CSK च्या पुढील सामन्या मध्ये खेळणार नाही कारण त्याच्या बरगडीला दुखापत झाली आहे. तो घरी परतला आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप