चाची ४२० नावाचा एक चित्रपट अनेक वर्षे आधी आला होता. या चित्रपटातील बालकलाकार आज आहे बॉलिवूडची एक सुंदर अभिनेत्री !
१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चाची ४२० नावाच्या चित्रपटामध्ये कमल हासन, तब्बू आणि अमरीश पुरी या प्रसिद्ध कलाकारांनी काम केले होते. त्यावेळी या चित्रपटामध्ये एक सुंदर आणि
भारती नावाची गोड मुलगी सुद्धा होती, जिच्या भोवतालीच पूर्ण चित्रपटाची स्टोरी फिरली आहे. या बालकलाकाराचे नाव फातिमा सना शेख असे आहे. या चित्रपटातील तिच्या भारतीच्या लाघवी भूमिकेमुळे त्याकाळी ती खूपच लोकप्रिय झाली होती.
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल कि, ती हीच अभिनेत्री आहे जीने काही काळ आधी आलेल्या अमीर खानचा दंगल चित्रपटामध्ये त्याची लेक गीता फोगाटची भूमिका केली होती. दंगल चित्रपटातील भुमिकेमुळे फातिमाला खूपच लोकप्रियता प्राप्त झाली. परंतु अगदी कमी लोकांना ही गोष्ट माहित आहे कि फातिमा हि तीच अभिनेत्री आहे जिने चाची ४२० या सिनेमामध्ये कमल हासनच्या लहान मुलीची भूमिका साकार केली होती.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी फातिमाने मीडियाला एक मुलाखत दिली होती, या दरम्यान तिने तिच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टींचा खुलासा केला. या मुलाखती दरम्यान तिने असे सांगितले कि चाची ४२० च्या शुटींगवेळी ती खूपच लहान होती, ज्यामुळे तिला आपल्या पहिल्या सिनेमाबद्दल फारसे काही माहिती देखील नव्हते. तिने सांगितले कि तिला फक्त एवढेच आठवत आहे कि, तिने कमल हासन सरांसोबत एक चांगला काळ व्यतीत केला होता. हा तिच्यासाठी खूप छान अनुभव होता.
View this post on Instagram
तिच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर इश्क आणि बडे दिलवाला या सिनेमांमध्येसुद्धा तिने बालकलाकार म्हणून वर्णी लावत काम केले आहे. यांनंतर ती बिट्टू बॉस आणि वन टू फोर या चित्रपटांमध्ये सुद्धा दिसली आहे. त्यानंतर तिचा बहुचर्चित दंगल हा चित्रपट आला होता ज्यामध्ये तिला चांगली ओळख मिळाली. आणि तिचे खूप नाव देखील झाले. ठग्स ऑफ़ हिन्दोस्तान या चित्रपटामध्ये ती आपल्याला शेवटची पाहायला मिळाली होती. तिच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर २०२० मध्ये ती लुडो आणि सुरज पर मंगल भारी आणि भूत पोलीस या नवीन बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.