जुना मित्र मॅक्सवेलला पाहून भावूक झाला चहल, चहलच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले..!

फिरकी उस्ताद युजवेंद्र चहल या आयपीएल मध्ये बॉलने फलंदाजांना आपल्या तालावर नाचायला लावत आहे, प्रत्येक सामन्यात चहलचा फिरणारा चेंडू फलंदाजा साठी धोकादायक ठरत आहे. या सोबतच चहल राजस्थान संघा साठी त्याच्या रकमे नुसार कामगिरी करत आहे, त्यामुळे संघ आहे त्याचे चाहते खूप खूश आहेत. पण तरीही कुठेतरी चहल आरसीबी मध्ये नसल्याचं दु:ख आहे, जो पुन्हा एकदा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वां समोर आला आहे आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

युझवेंद्र चहलची मैदाना वरील कामगिरी जितकी जबरदस्त आहे, तितकीच तो मैदाना बाहेर ही चर्चेत आहे. चहल आपल्या टीम मधील खेळाडू बरोबर मस्ती मज्जा करण्यात आघाडी वर आहे. युझवेंद्र चहल च्या जुन्या संघात म्हणजे आरसीबी मध्ये त्याचे अनेक खेळाडू खूप चांगले मित्र बनले होते, ज्यांची तो सोशल मीडिया द्वारे आठवण काढतो. विराट पासून मॅक्सवेल पर्यंत आणि सिराज पासून हर्षल पर्यंत सर्वजण चहलचे खास मित्र आहेत, जे अनेक प्रसंगी पाहायला मिळाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals)

राजस्थान संघा ने चहल आणि मॅक्सवेल चा एक व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये चहल त्याचा जुना मित्र मॅक्सवेल ला पाहून भावूक झाला होता. सामन्या आधी दोन्ही संघ एकत्र सराव करत होते, चहलने मॅक्सवेल ला मिठी मारली होती. मॅक्सवेल आणि चहल बराच वेळ एकमेकांशी बोलत होते.

IPL 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) साठी चांगली बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल अनिवार्य क्वारंटाईन पूर्ण करण्या साठी पहिले दोन सामने खेळू शकला नाही. आयपीएल 2021 नंतर, मॅक्सवेलला आरसीबीने त्यांची दुसरी पसंती म्हणून कायम ठेवले होते. दुसरीकडे, चहलला लिलावात जावे लागले होते, जिथे राजस्थान रॉयल्सने चहलला ६.५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. लेगस्पिनर चहलने नवीन फ्रँचायझी सह दोन सामन्यांत पाच विकेट्स घेऊन आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे.

ग्लेन मॅक्सवेल ने गेल्या महिन्यात २७ मार्च (रविवार) रोजी विनी रमनशी तामिळ रिती रिवाजा नुसार लग्न केले आहे. मॅक्सवेल २०१७ पासून भारतीय वंशाच्या विनीला डेट करत होता.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप