CID फेम ‘दया’ सध्या आहे या कामात व्यस्त! टीव्हीला त्यांनी का केला आहे bye bye?

९० च्या दशकाचा काळ म्हणजे टीव्ही मालिकांसाठीचा आणि प्रेक्षकांसाठीचा सुवर्णमय काळ होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. १९९८ पासून सोनी टीव्ही वर सुरू झालेली CID ही मालिका तब्बल २० वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत जोरात चालली. गुन्हे गारी आणि गुप्तहेर शैलीवर आधारित असलेली ही मालिका भारतातील सर्वात जास्त काळ चालणारी मालिका म्हणून फेमस झाली आहे.

सोनी टीव्हीवरील प्रसारित होणारी ही प्रसिद्ध मालिका अनेकांना खूप आवडली होती. सीआयडीचा प्रत्येक भाग हा सस्पेन्स आणि मजेदार कथांनी भरलेला होता. सीआयडीच्या सर्व टीमने देखील दमदार अभिनय करत सीरिअलचा टीआरपी वाढवण्यात बाजी मारलेली! त्यातले एसीपी प्रद्युम्न आणि दया यांचे डायलॉग आज ही आवडीने ऐकले जातात.

View this post on Instagram

A post shared by Dayanand Shetty (@dayanandshetty_official)

तेव्हा पासून ‘दया दरवाजा तोड दे’ हा त्यांचा प्रसिद्ध संवाद खूप गाजला. बीपीसी अंतर्गत बनवण्यात आलेल्या शोमध्ये जवळपास दीड हजार एपिसोड बनवण्यात आले होते. दया यांच्या कॅरेक्टरला सर्वांनी भरभरून प्रेम दिले आहे. गुंतागुंतीची केस सोडवताना दरवाजा तोडण्याची परिस्थिती आली की अजूनही सर्वांना दया आठवतात. कोणत्याही मोहिमेवर दरवाजे तोडावे लागले तर एसीपी प्रद्युम्न दया यांना दरवाजा तोडण्यास सांगायचे आणि नंतर दया एका लाथेत दरवाजा तोडायचा. ही त्यांची विशेष स्टाईल होती ज्यावर सर्व भारतीय फिदा झालेले.

दया यांचे खरे नाव दयानंद शेट्टी आहे. आज आम्‍ही तुमच्‍यासोबत या लेखातून दयाच्‍या जीवना संबंधी काही इंटरेस्टिंग गोष्‍टी शेअर करणार आहोत तेव्हा शेवट पर्यंत हा लेख नक्की वाचा. दया यांचा जन्म कर्नाटकात झाला. आधी दया स्पोर्ट्स मॅन होते पण एकदा अपघातात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांना पुन्हा खेळाकडे वळता आले नाही आणि त्यानंतर त्यांना अभिनयाच्या ऑफर्स येऊ लागल्या. सर्वात आधी दयाला अजय देवगन सोबत दिलजले या सुपरडुपर हिट सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.

या चित्रपटात दया हा बंदूकधारी होता, पण यातून त्याची प्रेक्षकांना वेगळी ओळख झाली नाही. सीआयडी शोमधूनच दया यांची ओळख सुरू झाली आहे. दयाची ही पहिलीच टीव्ही सीरियल होती आणि सीआयडीच्या माध्यमातून त्यांनी टीव्हीच्या दुनियेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आणि सर्वांच्या हृदयावर अधिपत्य गाजवू लागला. दयानंद शेट्टी यांना ‘दया दरवाजा तोड दे’ या संवादातून खूप प्रसिद्धी मिळाली.

दयानंद शेट्टी यांनी २२ वर्षांहून अधिक काळ सीआयडीमध्ये काम केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते टीव्ही वर फारसे दिसले नाहीत. दया यांनी २०१४ मध्ये अजय देवगणसोबत सिंघम या चित्रपटात काम केले होते. दया यांनी या चित्रपटात पोलिसाची भूमिकाही केली होती, त्यानंतर त्यांनी रिअॅलिटी शोमध्येही काम करण्यास सुरुवात केली. ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘झलक दिखला जा’ मध्ये दया सगळ्यांनाच दिसला होती. पण सध्या अनेक दिवसांपासून दयानंद शेट्टी इंडस्ट्री जगापासून दूर आहे, टीव्ही वर त्यांच्या अभिनयाची जादू पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. २०१९ नंतर दयानंद इंडस्ट्री मध्ये काम करताना फारसे दिसले नाहीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार दया आपली मुलगी आणि पत्नीसोबत मुंबईत कौटुंबिक सौख्याचा आनंद घेत असल्याचे समजते तसेच आणि काही दिवस परिवारासोबत राहून त्यांना आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप