कॉमेडियन भारती सिंगच्या घरी लवकरच येणार लहान पाहून ! गरोदरपणातील तिचे ट्रान्फॉर्मेशन पाहून थक्क व्हाल!!

छोट्या पडद्यावरची कॉमेडी क्विन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांनी काही दिवसांपूर्वी चाहत्यांसोबत त्यांच्या आयुष्यातील एक खास गोष्ट शेअर केली. वेगवेगळ्या कॉमेडी शो मधून झळकत प्रसिद्धी मिळवणारी भारती सिंग सध्या तिच्या आयुष्यातील एका सुरेखशा वळणावर येऊन पोहोचली आहे. कॉमेडियन भारती सिंग तिच्या विनोदी अंदाजासाठी कायम ओळखली जाते. आपल्या बोलण्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर सुरेख आनंद आणताना दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

ख्यातनाम विनोदी अभिनेत्री भारती सिंह प्रेग्नंट आहे. खुद्द भारतीनेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती आपल्या चाहत्यांनी दिली आहे. भारतीचा सध्या पाचवा महिना सुरू असल्याने एप्रिल २०२२ अखेरीपर्यंत तिची डिलिव्हरी होईल. प्रेग्नंट असलेल्या भारतीची तिचा नवरा हर्ष लिंबाचिताय खूप काळजी घेत आहे. प्रेग्नंट असलेल्या भारतीच्या बदल्या मूडची काळजी देखील तो घेत आहे.

भारती आणि तिचा पती, हर्ष लिंबाचीया हे आता त्यांच्या येणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. पालक होण्याच्या या प्रवासाची त्यांनी सुरुवात केली असून, प्रत्येक क्षण ते मनमुरादपणे जगताना दिसत आहेत. एप्रिल महिन्यात भारती बाळाला जन्म देणार असल्याचं वृत्त सूत्रांकडून समजलं आहे. बाळाचा जन्म होण्याआधी ती स्वत:मध्ये काही महत्त्वाचे आणि तितकेच आवश्यक बदलही करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

दरम्यानच्या काळात तिनं फिटनेस आणि स्वतःच्या स्थुलतेवरही तोडगा काढत एक निरोगी जीवनशैली आपलीशी केलेली दिसते. याचे थेट चांगले परिणाम तिला गरोदरपणात दिसून आले आहेत. बाळ पोटात असताना आईच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि तिच्या चेहऱ्यावरील ग्लो बराच बोलका असतो. भारतीने गरोदरपणातील केलेल्या या फोटोशूटमधून ही गोष्ट लगेचच सगळ्यांच्या लक्षात येत आहे.

खुद्द भारतीनंच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या या नव्या फोटोशूटमधील काही फोटो चाहत्यांच्या भेटीसाठी पोस्ट केले आहेत. ज्यात ती एक सुंदर गाऊन घालून पोज करताना दिसत आहे. मोकळे केस, चेहऱ्यावर असणारं गोड स्मितहास्य तिच्या या लूकला चार चाँद लावत आहे. भारतीचे हे फोटो आणि तिच्यात झालेला अमुलाग्र बदल अनेकांनाच थक्क करत आहे.

भारती प्रेग्नंट असली तरी तिच्या कामात खंड पडलेला नाही. ती आणि हर्ष एप्रिलपर्यंत काम करणार असल्याचे तिने सांगितले आहे. बाळाचे आगमन झाल्यानंतर हे दोघे मिळून त्याची काळजी घेणार आहेत. चित्रीकरणासाठी जात असलेल्या भारतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती फोटोग्राफर्सशी संवाद साधताना दिसत आहे. त्यावेळी तिने मुलगा हवा की मुलगी हे देखील तिने सांगितले.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप