अहमदाबादमध्ये शुक्रवारी खेळल्या गेलेल्या तिसर्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ९६ धावांनी पराभव करून मालिका ३ -० ने जिंकली. एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिला एकदिवसीय मालिका विजय आहे. नवीन कर्णधार रोहितनेही एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या कर्णधारपदापासून सुरू असलेली मालिका विजयाची परंपरा सुरू ठेवली आहे.
सामना संपल्यानंतर जेव्हा रोहितने ट्रॉफी उचलली तेव्हा त्याने सरळ जाऊन ती संघातील सर्वात तरुण खेळाडू रवी बिश्नोईकडे दिली आणि बाजूला उभा राहिला. धोनी-कोहलीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही परंपरा रोहितने सुरू ठेवली आहे. धोनी-कोहली यांनी मालिका विजयानंतर सर्वात तरुण खेळाडू किंवा पदार्पण करणाऱ्या खेळाडूला ट्रॉफीही दिली.
२१ वर्षीय रवी बिश्नोई चा वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. जरी तो संपूर्ण एकदिवसीय मालिकेसाठी बेंचवर बसला होता, तरी तो सुद्धा संघाचा खेळाडू आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रेयस अय्यर (८० ) आणि ऋषभ पंत (५६) यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर ५० षटकांत २६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा डाव ३७ षटकांत सर्वबाद १६९ धावांत आटोपला. भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी तीन, दीपक चहर-कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
रोहित शर्मा बद्दल बोलायचे झाल्यास लहानपणापासूनच क्रिकेटच्या प्रेमामुळे रोहितने टीव्हीवर कोणताही सामना पाहणे सोडले नाही, यासोबतच रोहितने बरेच स्ट्रीट क्रिकेट देखील खेळले आहे, ज्यामध्ये तो आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या खेळण्याच्या शैलीला अनुसरत असे. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग हे त्याचे आवडते क्रिकेटपटू आहेत. आपल्या घराभोवती खेळत असताना रोहित शर्माने अनेक शेजाऱ्यांच्या खिडक्यांच्या काचाही फोडल्या, त्यामुळे त्याला पोलिसांत तक्रारीचाही सामना करावा लागला.
रोहितला ऑफब्रेक गोलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीला दिशा द्यायची होती, त्यामुळे तो क्रिकेट अकादमीमध्ये आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, परंतु त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याची फलंदाजी क्षमता ओळखून त्याला गोलंदाजीपेक्षा फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्यानंतर रोहितला सलामीची संधी देण्यात आली. ज्यामध्ये त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली. आणि आता आज रोहित भारतासारख्या बलाढ्य टीम चा कर्णधार आहे.