क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही या भारतीय खेळाडूचा फॅन झाला, म्हणाला हा खेळाडू आहे ३६० डिग्री प्लेयर..!

आरसीबी च्या वतीने पुन्हा एकदा दिनेश कार्तिक ची बॅट जोरदार चालली आहे. शनिवारी झालेल्या दुहेरी हेडर च्या पहिल्या सामन्यात आरसीबी ने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत चौथा विजय नोंदवला. नाणेफेक हारल्या नंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबी ने दिल्ली कॅपिटल्स समोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरसीबी च्या फलंदाजी दरम्यान पुन्हा एकदा दिनेश कार्तिकची बॅट जोरदार चालली आहे. दिनेश कार्तिक ने आक्रमक फलंदाजी करताना अर्धशतक झळकावल्या नंतर ही नाबाद राहिला. या हंगामात दिनेश कार्तिक जबरदस्त फॉर्म मध्ये दिसत असून दिल्ली कॅपिटल्स सोबत च्या सामन्या नंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने दिनेश कार्तिकचे कौतुक केले आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध च्या सामन्यात आरसीबीने १६ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यातही दिनेश कार्तिकची बॅट जोरदार चालली होती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आक्रमक खेळी करताना त्याने ३४ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीनंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर दिनेश कार्तिकचे कौतुक करायला मागे हटला नाही.

तो दिनेश कार्तिकसाठी म्हणाला- दिनेश कार्तिक आरसीबीचा घातक खेळाडू आहे. कार्तिक क्रिझमध्ये ३६० अंश खेळण्याची क्षमता आहे, मग तो स्पिनर किंवा वेगवान गोलंदाजा असो. जेव्हा त्याने आक्रमण करण्यास सुरुवात केली तेव्हा पहिल्याच चेंडूने त्याने तसे करण्यास सुरुवात केली होती. दिनेश कार्तिक आयपीएल मध्ये अत्यंत आक्रमक फलंदाजी करत आहे. वयाच्या ३६ व्या वर्षीही त्याच्यात २६ चे स्पिरिट दिसून येत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावल्या नंतर सचिन तेंडुलकरही दिनेश कार्तिकचे कौतुक करण्यास मागे हटला नाही.

आरसीबीने आत्ता पर्यंत जेवढे सामने खेळले त्यात दिनेश कार्तिक धावा करताना दिसला आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कार्तिकने ३४ चेंडूत ६६ धावा केल्या आणि अनेक उत्कृष्ट फटके मारले होते. या आधी च्या सामन्यातही दिनेश कार्तिकने ३२, १४, ४४ आणि ७ धावा केल्या होत्या. कार्तिकच्या स्ट्राईक रेट बद्दल बोलायचे झाले तर तो २१५ च्या आसपास आहे. त्यामुळे दिनेश कार्तिक चर्चेचा विषय बनला आहे. या कामगिरीने चाहते खूप खूश आहेत आणि ते यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-२० विश्वचषका साठी टीम इंडिया मध्ये दिनेश कार्तिकला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप