क्रिकेटप्रेमींना पहायला मिळणार मिनी आयपीएल! सुरू होत आहे दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीग!

सध्या भारतातील आयपीएल नुकतेच संपले असून क्रिकेटशौकीन आतापासूनच पुढील आयपीएलची वाट आतुरतेने पाहताना दिसत आहेत! तर पुढच्यावर्षी पासून दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीग सुरू होत असून क्रिकेट रसिकांना मिनी आयपीएल पाहायला मिळणार आहे! आयपीएल मध्ये मालकी हक्क स्थापन केलेल्या कंपन्यांनी लीग मधील संपूर्ण सहा संघ विकत घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली. येत्या जानेवारी महिन्यापासून या टी-20 लीगचे आयोजन होणार असून दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथकडे या स्पर्धेची धुरा सोपवण्यात आली आहे.

आयपीएल सारखीच खेळण्यात येणार दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीग! रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडने केपटाउनच्या संघाला विकत घेतले आहे. सध्या रिलायन्स कडे आयपीएल मधील जास्त यशस्वी असणारा संघ मुंबई इंडियन्स आहे. यापूर्वी मुंबईने पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवल आहे.

आरएसपीजी स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ने डरबन या संघाला विकत घेतले आहे. मागच्या वर्षी याच कंपनीने विक्रमी बोली लावत लखनऊची टीम विकत घेतली होती, यासाठी संजीव गोयंका या ग्रुपने सेवन ७०९० इतके कोटी रुपये खर्च केले! सन टीव्ही कडे पोर्ट एलिझाबेथ या संघाचे मालकी हक्क आहेत. त्याचबरोबर आयपीएल मधील सनरायझर्स हैदराबाद या संघाचे मालकी हक्क सुद्धा टीव्ही ने मिळवले आहेत.

चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेडने जोहान्सबर्ग संघाला विकत घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे. २००८ रोजी झालेल्या लिलावात इंडिया सिमेंटने चेन्नई सुपर किंग्स संघ विकत घेतला होता. आणि आता यावेळी दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीग मध्येही इंडिया सिमेंटने हा संघ विकत घेतला आहे.

रॉयल स्पोर्ट्स ग्रुपने पार्लचा संघ विकत घेतला. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचा मालकी हक्क देखील रॉयल स्पोर्ट्स ग्रुप कडे आहे. चार वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स रॉयल्स ग्रुपकडे असल्याचे समजते. यात फॉक्स आणि डाबर या कंपन्यांचा समावेश होतो. यंदाच्या सीजनमध्ये तब्बल १४ वर्षानंतर राजस्थानच्या संघाला फायनल मध्ये पोहोचण्यात यश मिळाले होते.

प्रेटोरियाचा संघ दिल्लीच्या संघातील सहमालक जे एस डब्ल्यू यांनी विकत घेतला आहे. खेळांच्या बाबतीत जेएसडब्ल्यू ही भारतातील एक मोठी नावाजलेली कंपनी आहे. भारतातील अनेक खेळाडूंना ही कंपनी स्पॉन्सर करते. आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीग मध्ये देखील जेएसडब्ल्यू या संघात समावेश झाल्याचे दिसेल.

मीडिया कडून मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिका लीगच्या आधी सुद्धा अन्य क्रिकेट लीग मध्ये भारतीय कंपन्यानी आपली गुंतवणूक केली आहे. त्यामुळे जगभरात अशा अनेक लीग आहेत जिथे संघाचे मालक हे भारतीय आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप