IPL 2022 सर्वात रोमहर्षक मॅच KKR vs LSG डिकॉक आणि राहुल या जोडीने आयपीएल मध्ये रचला इतिहास, तब्बल ९ ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक ..!

आयपीएल २०२२ चा ६६ वा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम वर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाने क्विंटन डी कॉकचे धडाकेबाज शतक आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सला आठ गडी गमावून २०८ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सने हा सामना २ धावांनी जिंकला होता. त्याच वेळी, या सामन्यात (केकेआर विरुद्ध एलएसजी आकडेवारी) धावांचा आणि रिकार्ड्सचा वर्षाव झाला.

१) IPL च्या एका हंगामात सर्वाधिक 500+ धावा:
वॉर्नर ने हा विक्रम ६ वेळा केला आहे. त्याचबरोबर कोहली धवन आणि केएल राहुलने हा विक्रम ५ वेळा केला आहे. सलग पाच हंगामात अशी कामगिरी करणारा राहुल हा वॉर्नरनंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

२) केकेआर विरुद्ध डी कॉकचे शेवटचे पाच सामने.

७८*(४४)

२ (६)

५५ (४२)

५० (२९)

५०*(३६)

३) या मोसमात पहिल्यांदाच एलएसजीच्या दोन्ही सलामीवीरांनी एकाच डावात अर्धशतके झळकावली आहेत.

४) वॉर्नर आणि शिखर धवन यांनी २०१७ मध्ये हैदराबाद मध्ये KKR विरुद्ध सर्वोच्च सलामी भागीदारी (१३९) केली होती. त्याचबरोबर हा विक्रम लखनऊचा सलामीवीर राहुल आणि डी कॉकने २१० धावांची भागीदारी करून मोडीत काढला आहे.

५) क्विंटन डी कॉक ने त्याच्या IPL कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले आहे.

६) टी-२० क्रिकेटमध्‍ये प्रथम फलंदाजी करताना संघाने एकही विकेट न गमावण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे.

७) IPL मधील कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी:

२२९ कोहली – डीव्हिलियर्स आरसीबी विरुद्ध जीएल बंगलोर २०१६.

२१५* कोहली – डीव्हिलियर्स आरसीबी विरुद्ध एमआय मुंबई २०१५.

२१०* राहुल – डी कॉक एलएसजी विरुद्ध केकेआर मुंबई डीवायपी २०२२.

८) अभिजित तोमरने कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएलमध्ये पहिला डेब्यू सामना खेळला होता.

९) IPL मधील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर-

१७५* गेल RCB विरुद्ध पीडब्ल्यूआई बेंगळुरू २०१३.

१५८* बी मॅक्युलम केकेआर विरुद्ध आरसीबी बंगलोर २००८.

१४०* डी कॉक एलएसजी विरुद्ध केकेआर मुंबई डीवायपी २०२२.

१३३* एबी डिव्हिलियर्स आरसीबी विरुद्ध एमआय मुंबई २०१५.

१३२* केएल राहुल पीके विरुद्ध आरसीबी दुबई २०२०.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप