ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू शेन वॉर्नचे नि’धन, क्रिकेट विश्वात शोककळा पसरली..! पूर्ण क्रिकेट जगत दुःखात बुडाले आहे

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न याचे हृदय विकाराच्या झ’टक्याने नि’धन झाले आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी त्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. शेन वॉर्नच्या मृ त्यू च्या बातमीने सर्वांनाच ध’क्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो थायलंड मध्ये होता आणि त्याला हृदय विकाराचा झ’टका आला, त्यानंतर त्याचा मृ’त्यू झाला आहे.

जागतिक क्रिकेट इतिहासात फिरकीपटू मध्ये त्याच्या पेक्षा जास्त विकेट्स कोणत्याही खेळाडूने घेतलेल्या नाहीत. त्याच्या निधनाच्या बातमी ने संपूर्ण क्रिकेट विश्वात ख’ळबळ उडाली आहे. ही बातमी ऐकून सर्व दिग्गजांना धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये मुथय्या मुरलीधरन व्यतिरिक्त १००० बळी घेणारा दुसरा खेळाडू आहे. वॉर्नचा जन्म १३ सप्टेंबर १९६९ रोजी व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया येथे झाला होता.

शेन वॉर्नने १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया कडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने भारता विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला आणि ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेट खेळणारा ३५० वा खेळाडू ठरला होता. तर त्याने शेवटचा कसोटी सामना जानेवारी २००७ मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. वॉर्नने १४५ कसोटी सामन्यात ७०८ विकेट घेतल्या आहेत. या जादूई फिरकी पटूचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट मध्येही उत्कृष्ट विक्रम होता.

त्याने पहिला वनडे सामना १९९३ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. त्याने १९४ एकदिवसीय सामन्यां मध्ये २९३ विकेट घेतल्या होत्या. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वॉर्नने १३१९ विकेट घेतल्या आहेत.

शेन वॉर्नने ७३ टी-२० सामन्यात ७० विकेट घेतल्या आहेत. २१ धावांत ४ बळी ही त्याची टी-२० मधील सर्वोत्तम कामगिरी होती. शेन वॉर्न हा आयपीएल विजेता कर्णधारही होता. IPL च्या पहिल्या सत्रात म्हणजे २००८ मध्ये त्याच्या नेतृत्वा खाली त्याने राजस्थान रॉयल्स ला विजेते पद मिळवून दिले होते. अंतिम फेरीत राजस्थान ने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. आयपीएल २००८ मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळणारा शेन वॉटसन मालिकावीर ठरला होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप