दीपक चहर अडकला लग्न बंधनात, जया भारद्वाज सोबत घेतले सात फेरे..!

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर विवाह बंधनात अडकला आहे. प्रदीर्घ रिलेशनशिप नंतर त्याने त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज सोबत लग्न केले आहे. आग्रा येथील वायु विहार येथील रहिवाशी चाहर आणि जया यांचा फतेहाबाद रोड वरील जेपी पॅलेस मध्ये विवाह सोहळा पार पाडला. तत्पूर्वी मंगळवारी मेहंदी सोहळा आणि संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

नवरदेव बनलेल्या दीपक चहरने घोडी वर बसून बँडवाल्यासह मिरवणूक काढत हॉटेल गाठले. दीपक ने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि पगडी घातली होती. दीपकचा चुलत भाऊ लेग- स्पिनर राहुल चहर आणि बहीण मालती चहर यांनी बँड-बाजा च्या ताला वर जोरदार डान्स केला होता.

मीडिया रिपोर्ट्स नुसार, रात्री १० वाजता लग्नाचा विधी सुरू झाला होता. दुसरीकडे, नव वधू जया भारद्वाजने ही मस्त गेटअप केला होता. दीपक आणि जया यांच्या लग्नात दोन्ही कुटुंबातील लोक आनंदाने नाचत होते. हॉटेल जेपी पॅलेस मध्ये दीपक आणि जयाच्या लग्नाची शाही तयारी करण्यात आली होती. विशेष पाहुण्यांनी वराचे वडील लोकेंद्र सिंह चहर, काका देशराज चहर, भाऊ राहुल चहर, बहीण मालती यांच्या सोबत डान्स केला होता.

यापूर्वी मेहंदी आणि संगीत समारंभातील दीपक चहर आणि जया यांची देसी शैली लोकांना आवडली होती. मनीष मल्होत्राने लग्ना साठी दीपक चहर आणि जया भारद्वाज यांचा पोशाख डिझाइन केला आहे. चहरच्या कुटुंबातील सदस्य त्याच्या पोशाखाशी जुळणाऱ्या थीम मध्ये मिरवणुकीत दिसले होते.

गेल्या वर्षी यूएई मध्ये झालेल्या आयपीएल सामन्या दरम्यान दीपक ने जयाला स्टेडियम मध्ये प्रपोज केले होते. याआधी दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. आयपीएल सामन्या दरम्यान जया अनेक वेळा स्टेडियम मध्ये दीपकला चिअर करताना दिसली होती.

जयाचा भाऊ सिद्धार्थ बिग बॉस मध्ये दिसला आहे. सिद्धार्थ एमटीव्ही स्प्लिट्सविला सीझन २ चा विजेता देखील आहे. सिद्धार्थ ने बहीण जया च्या एंगेजमेंटचे फोटो शेअर करून शुभेच्छाही दिल्या होत्या. IPL २०२२ च्या मेगा लिलावात CSK ने चहरला १४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र, दुखापती मुळे तो संपूर्ण मोसमातून बाहेर पडला होता.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप