दीपक हुडा आणि संजू सॅमसनने केली धडाकेबाज खेळी, एकाच मॅच मध्ये एवढे विक्रम मोडून रचला इतिहास..!!

टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी टीम इंडियासाठी शानदार फलंदाजी केली. त्याच्या शानदार फलंदाजीने अनेक विक्रम मोडीत काढले.

या सामन्यात संजू सॅमसन डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या दीपक हुड्डाने स्फोटक फलंदाजी केली. हे पाहून स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांना आनंद झाला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी धमाकेदार खेळी करत T-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. या दोन खेळाडूंमधील शेवटच्या सामन्यात दुसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम झाला आहे. इशान किशन (३) स्वस्तात बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी क्रीझवर आलेल्या दीपक हुडाने सलामीवीर संजू सॅमसनसोबत १७६ धावांची शानदार भागीदारी केली. आणि ही भागीदारी T-२०  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी भागीदारी आहे. हा विक्रम आपल्या नावावर करताच या दोन्ही फलंदाजांनी अव्वल स्थान गाठले आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepak Hooda (@deepakhooda30)

याआधी हा विक्रम इंग्लंडचे फलंदाज जोश बटलर आणि डेव्हिड मलान यांच्या नावावर होता. त्यादरम्यान दोन्ही फलंदाजांमध्ये १६७ धावांची नाबाद भागीदारी झाली. इंग्लंडच्या या फलंदाजांनी१  डिसेंबर २०२० रोजी केपटाऊनमध्ये आफ्रिकेविरुद्ध ही भागीदारी केली होती. पण आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन आणि दीपक हुडा यांनी १६८ धावा करत हा विक्रम केला आहे.दुसऱ्या विकेटसाठी १६६ धावांचा विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धने आणि कुमार संगकाराच्या नावावर आहे. मात्र, आता या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. आणि दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांच्यातील या भागीदारीनंतर श्रीलंकेच्या संघाचे फलंदाज या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने लवकरच सलामीवीर इशान किशनची (३) विकेट गमावली. मात्र यानंतर संजू सॅमसनने उत्कृष्ट खेळी केली आणि 16 षटकात भारतीय संघाची दुसरी विकेट पडली नाही. या सामन्यात संजू सॅमसनने 42 चेंडूत 77 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटने ९चौकार आणि ४ षटकारही मारले.

दुसरीकडे, दीपक हुडाने शानदार शतक ठोकले. दीपक हुडाने आपल्या शतकी खेळीदरम्यान ५७ चेंडूत १८३ च्या स्ट्राईक रेटने १०४ धावा केल्या. या सामन्याच्या इनिंगमध्ये त्याच्या बॅटने ९ चौकार आणि ६ षटकार मारले. मात्र, यानंतर भारताचा डाव ढासळताना दिसला. सूर्यकुमार यादव (१५), दिनेश कार्तिक (०) आणि हर्षल पटेल (०) आणि अक्षर पटेल ०धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. तर हार्दिक पांड्या १५ आणि भुवनेश्वर कुमार १ धावेवर नाबाद परतले.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप