तेंडुलकर ने भारतीय क्रिकेट संघा साठी अनेक धावा करून सामने जिंकले तेव्हा बडोद्याचा हा तरुण खूपच तरुण होता. २०२२ मध्ये दीपक हुडाने आता सचिन च्या नावा वर असलेला राष्ट्रीय विक्रम मोडून स्वतःच्या नावा वर केला आहे. भारतीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड क्रिकेट संघ यांच्या तील मालिकेतील दुसरा T-२० सामना डब्लिन येथे खेळवला गेला होता. दुसऱ्या T-२० सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या ने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने भारता च्या बाजूने काम केले कारण फलंदाजांनी परिस्थितीचा फायदा घेतला आणि मेन इन ब्लू संघाला २००+ धावा करण्यास मदत केली होती.
सलामी वीर संजू सॅमसन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पहिले अर्धशतक झळकावले होते. त्याने दीपक हुडा सोबत दुसऱ्या विकेट साठी १७६ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. या दोन्ही खेळाडूंनी आयरिश गोलंदाजांचे आक्रमण उद्ध्वस्त करत भारताला स्पर्धेत आघाडी मिळवून दिली होती. सॅमसनचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक २३ धावांनी हुकले होते, तर दीपक हुडा ने त्याचे पहिले शतक पूर्ण केले होते. यासह आयरिश भूमी वर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
Deepak Hooda is the first Indian to score a men’s international hundred in Ireland.
Previously the highest for IND in IRE was 99 by Sachin Tendulkar in 2007 (against South Africa).#IREvIND
— Kausthub Gudipati (@kaustats) June 28, 2022
२००७ मध्ये सचिन तेंडुलकर ने दक्षिण आफ्रिके च्या क्रिकेट संघा विरुद्ध च्या एकदिवसीय सामन्यात भारता साठी ९९ धावा केल्या होत्या. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना आयर्लंड ने आयोजित केला होता. दीपक हुडाने आपले शतक पूर्ण केले आणि यादीत सचिनला मागे टाकले आहे.
हुडाने आज आपल्या डावात ५७ चेंडूत १०४ धावा केल्या होत्या. त्याने नऊ चौकार आणि सहा षटकार मारले होते. गेल्या सामन्यात हुड्डा ४७ धावांवर नाबाद राहिला होता. त्या मुळे आयर्लंड क्रिकेट संघा विरुद्ध च्या या मालिकेत त्याने बाद होण्या पूर्वी १५१ धावा केल्या होत्या. हुड्डा ही खेळी कधीच विसरणार नाही कारण तो T-२० शतक झळकावणारा चौथा भारतीय ठरला आहे.