करोडपती असूनही साधारण माणसासारखे जगणे पसंत करतात आपले नाना! अभिमानास्पद

आज काल पैसा हेच माणसाच्या जीवनाचे सर्वस्व बनले आहे. पैश्याच्या जोरावरती माणूस काहीही करू शकतो. बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीमधील स्टार भरपूर पैसे कमवून अगदी चैनीचे जीवन जगताना दिसतात. लाखो करोडो रुपये खर्च करणे म्हणजे त्यांच्यासाठी हाताचा मळ आहे. परंतु याच इंडस्ट्रीमध्ये असे हि काही कलाकार आहेत ज्यांच्याकडे करोडोंची मालमत्ता असून सुद्धा ते कोणत्या गोष्टीचा माज करत नाहीत. हे कलाकार एखाद्या साधारण माणसासारखं आपलं आयुष्य जगत असतात. आज आम्ही या लेखामध्ये अशाच एका दिग्गज कलाकारा बद्दल सांगणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by Nana patekar (@nana.patekar)

बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनय आणि संवादांद्वारे हिंदी आणि मराठी या दोन्ही इंडस्ट्रीवर दीर्घकाळ राज्य केले आहे आणि आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपटात काम केले असून लोकांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे.

नाना पाटेकर यांच्याकडे आज कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे, परंतु असे असूनही नाना पाटेकर एका सामान्य माणसाप्रमाणे साधे जीवन जगणे पसंत करतात. नाना पाटेकर आपल्या भक्कम अभिनय आणि तडफदार संवादांमुळे अतिशय लोकप्रिय झालेले.

View this post on Instagram

A post shared by Nana patekar (@nana.patekar)

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात १ जानेवारी १९५१ साली नाना पाटेकर यांचा जन्म झाला होता आणि नाना पाटेकर यांनी ‘गमन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. क्रांतिवीर आणि तिरंगा या दोन महत्वपूर्ण चित्रपटातून त्यांना बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खरी ओळख मिळाली. याशिवाय नाना मराठी चित्रपट इंडस्ट्री मध्ये हि लोकप्रिय आहेत. त्यांच्या नटसम्राट या सिनेमातील भूमिकेची खूप चर्चा आणि कौतुक झाले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार नाना पाटेकर सध्या १० दशलक्ष डॉलर्स मालमत्तेचे मालक आहेत, त्याबरोबर त्यांनी खडकवासला येथे एक आलिशान फार्म हाऊस देखील खरेदी केले असल्याचे समजते आणि त्याशिवाय त्यांच्याकडे इतरही अनेक स्थावर मालमत्ता आहेत. हे फार्महाऊस २४ एकर मध्ये पसरलेले असून दिसायला खूप आलिशान आहे.

त्यांच्या या विशाल फार्म हाऊसमध्ये एकूण ७ खोल्या आणि एक मोठा हॉल देखील आहे. नाना आपला बहुतांश वेळ या फार्म हाऊसमध्ये घालवणे पसंत करतात. या फार्म हाऊसमध्ये नाना पाटेकर गहू आणि हरभरा यांसारखी धान्ये ही पिकवतात आणि विक्रीनंतर यातून त्यांना कोणताही नफा मिळाला तरी ते त्यांच्या मजुरांमध्ये वाटून घेतात.

View this post on Instagram

A post shared by Nana patekar (@nana.patekar)

आज नाना पाटेकर यांच्या वयाने ७० गाठली आहे, पण या वयातही नाना पाटेकर बर्‍यापैकी फिट दिसतात. नाना पाटेकर कोणत्याही चित्रपटासाठी १ कोटी किंमत घेतात. नाना पाटेकर म्हणतात,” कि मी आवड म्हणून अभिनेता झालो नाही तर मला परिस्थितीने अभिनेता बनवले आहे.”

म्हणूनच नाना आपले आयुष्य खुपच साधे पणाने जगतात. नाना पाटेकर यांचा अंधेरी, मुंबई येथे देखील एक अतिशय सुंदर फ्लॅट आहे आणि आजच्या घडीला त्याची किंमत सुमारे ७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे आणि नाना पाटेकर यांना गाड्यांची ही खूप आवड आहे आणि त्यांच्याकडे ८१ लाख रुपयांची ऑडी क्यू ७ कार आहे, तसेच महिंद्रा आहे स्कॉर्पिओ आणि रॉयल एनफील्ड सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप