टीम इंडिया ९ जून २०२२ पासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी केएल राहुलची टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मालिकेत टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत केएल राहुलसमोर युवा खेळाडूंसह मालिका जिंकण्याचे मोठे आव्हान असेल. कर्णधार म्हणून केएल राहुलसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे.
९ जूनपासून सुरु होणाऱ्या या आफ्रिकेविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत संजू सॅमसनला संधी मिळालेली नाही. या मालिकेत टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत केएल राहुलसमोर युवा खेळाडूंसह मालिका जिंकण्याचे मोठे आव्हान असेल. त्याचबरोबर संजू सॅमसनला निवड समितीने संघात स्थान दिलेले नाही. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएल २०२२ मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आपल्या संघासाठी अनेकदा मॅच विनिंग इनिंग्स खेळल्या. त्याने आयपीएलमध्ये १४६.९ च्या स्ट्राईक रेटने वेगवान धावा केल्या आहेत. संजूच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएल २०२२ च्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला.
View this post on Instagram
मात्र, तो आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. पण त्याच्या कर्णधारपदाचे अनेक दिग्गजांनी कौतुक केले. असे असूनही निवड समितीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळेच आगामी टी-२० मालिकेसाठी त्याला टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. संजूने आयपीएल २०२२ मध्ये ४५८ धावा केल्या होत्या. IPL २०२२ च्या आधी, जेव्हा भारतीय संघ श्रीलंकेसोबत T20 मालिका खेळत होता, तेव्हा संजू सॅमसनला टीम इंडियाच्या संघात संधी देण्यात आली होती. उभय संघांमधील ही मालिका फेब्रुवारीमध्ये झाली. संजू सॅमसनकडे कर्णधारपदासोबतच यष्टिरक्षण कौशल्यही आहे.
दबावात चांगली कामगिरी करणाऱ्या कर्णधारांपैकी तो एक आहे. अशा स्थितीत संजूचा हा अनुभव टीम इंडियाच्या कामी येऊ शकतो. अशी माहिती आहे की संजूने २०१५ साली टीम इंडियासाठी पदार्पण केले होते आणि तो भारतासाठी १३ टी-२० सामने खेळला आहे. लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.