डरहम विरुद्ध डेवाल्ड ब्रेव्हिसने दाखवला खतरनाक फॉर्म, ४९ चेंडूत केल्या ११२ धावा, अर्जुन तेंडुलकरची कामगिरी राहिली साधारण..!

आयपीएल टीम मुंबई इंडियन्स ने पुढच्या हंगामा साठी म्हणजेच २०२३ च्या तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई चे काही खेळाडू पुढील हंगामा च्या तयारी साठी सध्या इंग्लंड मध्ये असून डरहम सोबत सराव सामने खेळत आहेत. या युवा खेळाडूंना चांगला अनुभव मिळावा या साठी मुंबई संघाने आपल्या खेळाडूंना तीन महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्या वर नेले आहे. अशा परिस्थितीत मुंबई रिलायन्स क्रिकेट संघाच्या नावावर सराव सामना खेळत आहे.

२२ जुलै रोजी मुंबई इंडियन्स चा डरहम विरुद्ध सामना झाला, ज्या मध्ये रिलायन्स क्रिकेट संघाने ८१ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात शतक झळकावणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हिसचा रिलायन्सला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता.

डरहम विरुद्ध रिलायन्स क्रिकेट संघा कडून खेळताना डेवाल्ड ब्रेविसने दमदार शतक झळकावले होते. ब्रेव्हिसला डरहॅम विरुद्ध चांगली कामगिरी करता आली. त्याने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांसह ११२ धावांची खेळी खेळली होती. रिलायन्स क्रिकेट संघाने २० षटकात ९ गडी गमावून २११ धावा केल्या होत्या, त्या नंतर डरहम क्रिकेट संघ अवघ्या १३० धावांवर आटोपला होता. त्याच वेळी अर्जुन तेंडुलकर ही या सामन्यात खेळला आणि त्याने ३ षटके टाकली आणि २७ धावा दिल्या पण त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

हे लक्षात घेण्या सारखे आहे की आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच खराब होती कारण या संघातील बहुतेक खेळाडू तरुण होते. अशा परिस्थितीत मुंबई ने आपल्या युवा खेळाडूंना अनुभव देण्या साठी इंग्लंडला नेले आहे. इंग्लंड मधील रिलायन्स क्रिकेट संघाने आता पर्यंत सलग ८ सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. या दृष्टिकोनातून पाहिल्यास मुंबई ने आधीच आयपीएल २०२३ साठी तयारी सुरु केली आहे.

प्रत्येकाला डेवाल्ड ब्रेविस बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. ब्रेव्हिस हा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आहे, ज्याने अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत चमकदार फलंदाजी करून चर्चेत आला होता. त्याची फलंदाजीची शैली दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स सारखी आहे. यामुळेच तिला ज्युनियर अब आणि बेबी असेही म्हंटले जाते. खुद्द एबी डिव्हिलियर्सने त्याच्या प्रतिभेचे कौतुक केले आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप