पावनखिंड सिनेमांमध्ये बाजीप्रभुंची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकर यांनी शिवाजी महाराज ना शोभेल असं सुंदर घर विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलेलं आहे..

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचे वारे वाहू लागले आहेत! वेगवेगळे दिग्दर्शक इतिहासातील पात्रे पडद्यावर आणून त्यांचा इतिहास नव्याने जिवंत करत आहेत. असाच एक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेला सिनेमा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे!! शूर वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या धैर्य, शौर्य आणि पराक्रमाचा असा तिहेरी संगम असलेल्या पावनखिंड सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले! बॉक्स ऑफिसवर देखील तुफान गल्ला जमवत हाऊसफुल्लची पाटी दिमाखात झळकवलेल्या या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १९ तारखेला प्रवाह पिक्चर या वाहिनीवर प्रेक्षकांना बघायला मिळाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar)

या चित्रपटामध्ये अभिनेता अजय पुरकर यांनी यातील प्रमुख पराक्रमी बाजीप्रभू देशपांडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकार केली आहे. चित्रपटामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी त्याच्या वाट्याला आलेली भूमिका म्हणजे एक प्रकारे परकायाप्रवेशच असतो, म्हणूनच अजय पूरकर यांनी यातील बाजीप्रभू फक्त साकारले नाहीत तर अगदी खऱ्या अर्थाने जगले आहेत! याच प्रेमापोटी त्यांनी आता विशाळगडाच्या पायथ्याशी घर देखील बांधल आहे. ज्या पुण्यभूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं, अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांचे स्वप्न आता पूर्ण ही झालेलं आहे!

एका मुलाखतीदरम्यान अजय म्हणाले की:

” पावनखिंड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर विक्रम रचला आहे. या सिनेमामुळे फक्त मोठ्याचं नाही तर छोट्या दोस्तांचंही भरभरून प्रेम मिळाल आहे! हे सगळे छोटे मित्र मला आवडीने भेटवस्तू घेऊन येतात. एक किस्सा तर एका पालकांनी मला सांगितला तो असा की, त्यांचा मुलगा मध्यरात्री झोपेतून उठला आणि म्हणाला ‘बाजीप्रभू एकटेच उभे राहून लढत आहेत, मला तिकडे घेऊन चला’ हे निरागस प्रेम पाहून भारावून जायला होतं! या पिढीपर्यंत जेव्हा आपल्या शूरवीरांचे बलिदान पोहोचते तेव्हा खरा सिनेमा यशस्वी झाला असं ठामपणे म्हणता येईल!! या शब्दात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या!

या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नुकताच १९ जूनला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर संपन्न झाला. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात संपूर्ण कुटुंबाने एकत्र येण्याचे प्रसंग खूपच कमी वेळा जुळून येतात. परंतु चित्रपट हे एक असे जादुई माध्यम आहे जे संपूर्ण परिवाराला एकत्र आणते. या निमित्ताने जुन्या आठवणींनाही उजाळा मिळतो आणि आपल्या नकळतच चेहर्‍यावर हास्याची आणि समाधानाची लकेर उमटून जाते! संपूर्ण परिवाराला एकत्र आणून नात्यांची वीन घट्ट करण्यासाठी असे क्षण आयुष्यात येणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे! हेच ध्येय साध्य करण्यासाठी प्रवाह पिक्चर ही नवी वाहिनी टेलिव्हिजन वर सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दर रविवारी नवनवीन चित्रपटांचे टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चर या वाहिनीवर सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत! या सिनेमापासून या धमाकेदार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर ची सुरुवात दणक्यात झालेली आहे!

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप