सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर असणाऱ्या वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं? , साता जन्माच्या गाठी, रंग माझा वेगळा या मालिका घराघरात फेमस झाल्या आहेत!
‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका काही दिवसांपूर्वीच चॅनेल वर प्रसारित करण्यास सुरुवात झाली आहे. या मालिकेत छोटी मुलगी ओवीची खट्याळ भूमिका साकारणारी गोड बालकलाकार saisha salvi ही देखील एक छोटी सोशल मीडिया स्टार म्हणून प्रसिद्ध आहे.
View this post on Instagram
सिनेमा असो की टीव्ही वेगवेगळे रिल्स बनवून फेमस होणाऱ्या अनेक सोशल मीडिया स्टार्संना आज मालिकांमध्ये काम करून झळकण्याची संधी मिळत आहे. यात झी मराठी वाहिनी वरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमधील छोटी परी म्हणजेच मायरा वायकुळ असेल किंवा देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत काम करणारी क्यूटी ‘मीमी खडसे’ असू देत या दोघीही सोशल मीडिया वरील फेमस स्टार बनल्या आहेत.
View this post on Instagram
यातच आता अजून एका छोट्या स्टारची भर पडली आहे ती म्हणजे रंग माझा वेगळा या मालिकेतील साईशा भोईर हिची! ही देखील सोशल मीडियावर स्टार आहे. मालिकेत येण्यापूर्वी या सगळ्या चिमुकल्या सोशल मीडियावरच्या फेमस स्टार होत्या आणि आजही त्यांचं स्टारडम टिकवून आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका आता काही दिवसांपूर्वीच प्रसारित करण्यात आली आहे. या मालिकेत ओवीची खोडकर भूमिका साकारणारी बालकलाकार देखील सोशल मीडिया वरील फेमस स्टार आहे. आजच्या या लेखात आपण तिच्याविषयीचीच माहिती जाणून घेणार आहोत.मूळची पुण्यातली आहे साईशा!
View this post on Instagram
‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतुन घराघरात पोहोचणाऱ्या चिमुकलीचे नाव साईशा साळवी असं आहे. साईशा साळवी ही चाईल्ड मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटो पाहून तुमच्या लक्षात येईल. साईशाचे आई वडील पुण्यात राहायला आहेत. साईशाच्या आईचे नाव श्वेता साळवी तर वडिलांचे नाव हेमंत साळवी असे आहे. साईशाला आणखी एक बहीण असल्याचे समजते. साईशाचे बाबा हेमंत साळवी हे हॉटेल व्यावसायिक आहेत. साईशा आता चार वर्षांची आहे पण एवढ्या कमी वयातच तिने मॉडेलिंग क्षेत्रात भरपूर नाव कमावले आहे. तिच्या सोशल मीडियावर तिचे विविध वेशभूषेतले फोटो पाहायला मिळतात.
साईशाने आतापर्यंत लहान मुलांच्या कपड्यांच्या विविध ब्रॅण्डसाठी मॉडेल म्हणून देखील काम केले आहे. यासोबतच तिने हेन्को केअर, पी. एन. जी. ज्वेलर्स यासारख्या विविध व्यावसायिक जाहिरातीं मध्ये ही काम केल्याचे समजते. टाइम्स फॅशन विक, बॉलिवूड फॅशन विक यासारख्या मोठ्या मंचावर साईशाने रॅम्पवॉक देखील केला आहे.
आता साईशा कोठारे व्हिजनच्या ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत ती ओवीची भूमिका निभावताना दिसत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत असून सगळीकडे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.