पावनखिंड’मध्ये सोयराबाईंची दमदार भूमिका निभावणाऱ्या रुची सवर्णच्या नवऱ्याचे हे फोटो पाहिले का? त्याला पाहून विश्वास बसणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट २१ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा रिलीज झाल्या नंतरही सध्या सगळीकडे ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचीच तुफान चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आणि कमाईचे नवे रेकॉर्ड देखील स्थापित केले आहेत.

सह्याद्रीच्या कातळात असलेल्या ‘घोडखिंडी’ची ‘पावनखिंड’ कशी झाली, याचा प्रवास चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज (चिन्मय मांडलेकर) यांच्या तोंडून ऐकायला आणि पाहायला मिळतो. चित्रपटाची सुरुवात होते, ती राज्याभिषेकापूर्वी..आणि हळूहळू सिनेमा पकड घेत जातो. चित्रपट पाहताना पदोपदी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाविषयी इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या काही ओळी आठवतात, पण केवळ काही ओळींमध्ये संपेल इतकी छोटी ही घटना नक्कीच नाही. म्हणूनच हा चित्रपट बघणं आणि समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

बाजीप्रभू देशपांडे यांच्या खांद्याला खांदा लावून लाभलेल्या वीरांची ओळख आपल्याला चित्रपटात होते. रायाजीराव बांदल (अंकित मोहन), कोयाजीराव बांदल (अक्षय वाघमारे), बहिर्जी नाईक (हरिश दुधाडे), सरनोबत नेताजी पालकर (विक्रम गायकवाड), श्रीमंत शंभूसिंह जाधवराव (बिपीन सुर्वे), फुलाजीप्रभू देशपांडे (सुनील जाधव), हरप्या (शिवराज वायचळ), गंगाधरपंत (वैभव मांगले) आणि महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा नरवीर शिवा काशीद (अजिंक्य ननावरे) या चेहऱ्यांचं, त्यांच्या कामगिरीचं आणि शौर्याचं दर्शन या सिनेमात होतं. यात लेखक म्हणून दिग्पालचंही श्रेय आहे, कारण त्यानं प्रत्येक भूमिका बारकाईनं लिहिली आहे.

या चित्रपटामुळे प्रत्येक कलाकाराला एक नवी ओळख मिळाली आहे. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीरेखेचं सर्वत्र प्रचंड कौतुक केलं जात आहे. पण या चित्रपटात असे दोन कलाकार आहेत. जे चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारत असले तरी, खऱ्या आयुष्यात त्यांचं फार खास नातं आहे. खरं तर हे कलाकार नवरा बायको आहेत!

‘पावनखिंड’ या चित्रपटात अभिनेता अंकित मोहनने ‘श्रीमंत रायाजीराव बांदल’ यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रुची सवर्णने ‘मातोश्री सोयराबाई राणीसरकार’ ही महत्वाची भूमिका आपल्या दमदार अभिनयाने साकारली आहे.

अंकित आणि रुची हे खऱ्या आयुष्यात पती-पत्नी आहेत. २०१५ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकलेले. आता या दोघांना दोन महिन्यांचा एक मुलगादेखील आहे त्याचं नाव रुआन असं आहे. अंकित आणि रुचीने यापूर्वी अनेक हिंदी मालिकांमधूनकाम केलं आहे. अंकित हा अमराठी अभिनेता असल्याचे समजते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप