बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि आमिर खानचा भाचा असलेला इम्रान खान हा चंदेरी दुनियेमध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटामुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळाली होती. परंतु त्यानंतर तो चित्रपटांमधून फारसा दिसला नाही. परंतु असं असलं तरी आमिरचा तो भाचा असल्याने सतत चर्चेत असायचा, म्हणूनच त्याने २०११ मध्ये अवंतिका मलिक सोबत केलेल लग्न देखील चांगलंच गाजलं होतं! या दोघांनी अगदी थाटामाटात लग्न केलं होतं, दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते! अगदी बॉलिवूडमधील बेस्ट कपल म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात यायचं. परंतु २०१९ सालापासून या दोघांमध्ये कटकटी सुरू झाल्याच्या बातम्या पसरायल्या लागला आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला!! आणि आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच हे दोघे एकमेकांपासून विभक्त होणार आहेत…
सूत्रांकडून तसेच या दोघांच्या जवळच्या नातलगांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कुरबुरी सुरू झालेल्या, त्यामुळे त्यांच्या नात्यात तणावही निर्माण झालेला. हा तणाव दूर करण्याचे दोघांनीही कसोशीने प्रयत्न केले. अवंतिकाला तर हे लग्न तुटू नये असंच वाटत असल्याने तिने देखील यासाठी मनापासून प्रयत्न केले, परंतु या दोघांचेही प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे समजते आणि यामुळेच आता या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
अवंतिकाने केले मनापासून प्रयत्न…: सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आधी इम्रान जेव्हा त्यांचं हे नातं संपवण्याचा विचार मनात आणत होता तेव्हा पत्नी अवंतिका त्यांचं नातं सुरळीत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती. मात्र तिचे हे सगळे प्रयत्न फेल झाल्याने आता दोघेही वेगळे होण्याच्या निर्णयावर येऊन पोहचले आहेत. मात्र अजूनही घटस्फोटासाठी त्यांनी कोर्टात अर्ज दाखल केलेला नाही.
View this post on Instagram
धुमधडाक्यात झालं होतं लग्न!!: २०११ मध्ये इम्रान आणि अवंतिकाचा विवाह सोहळा थाटात पार पडला होता. या दोघांना आता सात वर्षाची एक मुलगी देखील आहे. परंतु दोघेही २०१९ पासून वेगळे राहत असल्याचे समजते. पण असे असले तरी काही दिवस आधी मुंबईतील ट्राइडेंट हॉटेलमध्ये झालेल्या एका लग्न समारंभात दोघांना एकत्र पाहायला मिळाले. परंतु इम्रान आणि अवंतिकाचा संसार मोडकळीस आलेल्याच्या चर्चा चंदेरी दुनियेत रंगल्या आहेत. मात्र अजूनही दोघांकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.