तुम्हाला माहित आहे का या कारणाने १९८३ च्या विश्वचषकात कपिल देवच्या नाबाद १७५ धावांची नोंद कॅमेरा मध्ये का झाली नाही..!

भारताचे माजी कर्णधार कपिल देव याने गुरुवारी सांगितले की, १९८३ च्या विश्वचषकात झिम्बाब्वे विरुद्ध नाबाद १७५ धावांची नोंद झाली नसल्या बद्दल मला कोणतीही खंत नाही. १९८३ च्या विश्वचषकातील विजय ही भारतीय इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. टीम इंडियाचा कर्णधार कपिलने १८ जून १९८३ रोजी टुनब्रिज वेल्सच्या मैदानावर झिम्बाब्वे विरुद्ध ऐतिहासिक खेळी खेळली नसती तर विजय मिळू शकला नसता.

View this post on Instagram

A post shared by Kapil Dev (@therealkapildev)

दुर्दैवाने भारतीय क्रिकेट चाहत्या साठी कपिलची खेळी कधीही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली नाही, कारण त्या वेळेस एकमेव प्रसारक असलेल्या बीबीसी ने देशव्यापी संप पुकारला होता. झिम्बाब्वेने भारताच्या ९ धावा वर ४ विकेट घेतल्या होत्या, कपिलने जबरदस्त क्रिकेट खेळून त्याच्या संघाला २६६/८ पर्यंत सन्माननीय धावसंख्या केली होती. भारताने हा सामना ३१ धावांनी जिंकला होता.

टेलिकॉम ऑपरेटरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देव म्हणाला, मला लोकांवर टीका करायला आवडत नाही. लोक म्हणतात की ते रेकॉर्ड झाले नाही याबद्दल तुम्हाला वाईट नाही वाटत, आणि मी नेहमी नाही म्हणतो कारण ती खेळी माझ्या मनात रेकॉर्ड झालेली आहे. या कार्यक्रमात, दूरसंचार ऑपरेटरने माजी भारतीय क्रिकेटपटू चा इमर्सिव्ह आणि भारताचा पहिला ५G पॉवर्ड होलोग्राम प्रदर्शित केला आणि झिम्बाब्वे विरुद्ध क्रिकेटरच्या नाबाद खेळीची चर्चा केली.

View this post on Instagram

A post shared by Kapil Dev (@therealkapildev)

१९८३ मध्ये कपिल देवची क्रिकेट कारकीर्द चांगलीच सुरू होती. यामुळे त्याच वर्षी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्करला कर्णधार पदा वरून हटवून कपिल देव याला भारताचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्यानंतर लगेचच कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला विश्वचषक जिंकला होता. १९८३ मध्ये, कपिलने वेस्ट इंडिज विरुद्ध अहमदाबाद कसोटीत शानदार गोलंदाजी करून ८३ धावांत नऊ विकेट घेतल्या आणि त्याला वेस्टन क्रिकेट ऑफ द इयर म्हणून ही गौरविण्यात आले होते. कपिलची खासियत म्हणजे तो कमी बोलत असे.

कपिल देव ने १९९४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतला होता. त्या नंतर १९९ मध्ये कपिल देव याला भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनवण्यात आले होते. कपिल देव प्रशिक्षक म्हणून यशस्वी ठरला नाही, त्याने केवळ एका कसोटी सामन्यात संघाला विजय मिळवून दिला होता. यादरम्यान तो मॅच फिक्सिंगचा आरोप करत काही वादात सापडला होता. त्यामुळे कपिल देव ला ऑगस्ट २००० मध्ये भारताच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप