झुंड चित्रपटातील डॉन आठवतो का, करत आहे या भरतीची तयारी जाणून अभिमान वाटेल..!

नागराज मंजुळे दिग्दर्शित तगडी स्टार कास्ट असलेला झुंड सिनेमा आता प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्यापासून त्यातली डॉन, बाबू, संभ्यासारखी अतरंगी पात्रं लोकांना आवडली आहेत. अभिनयाची कोणतेही बॅकग्राऊंड नसताना, अगदी हालाखीच्या परिस्थितीतली ही पोरं अमिताभ बच्चन यांसारख्या महानायकासमोर ज्या जिद्दीने उभी राहिली, त्याचं सगळीकडे कौतुकच होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankush Gedam (@ankushgedam_)

झुंड’मध्ये ‘डॉन’ची भूमिका साकारणारा अंकुश गेडाम आपला अनुभव सांगताना म्हणाला की, “आधी मी लोकांमध्ये उभा असायचो, आज लोक माझ्यासाठी उभं राहतायेत, याचा खूप मोठा आनंद आहे!”

झुंडसाठी निवड झाल्यापासून आता त्यातील कलाकारांच्या वाट्याला येणाऱ्या कौतुकापर्यंतचा सगळा प्रवास सोशल मीडियावर मुलाखतींच्या रुपात झळकत आहे.

अंकुशचा झुंड हा पहिलाच सिनेमा, वास्तविक जीवनात पोलीस भरतीची तयारी करणारा, ज्याला सिनेमाबद्दल ही फारशी काही माहिती नव्हती असा अंकुश ‘झुंड’चा ‘डॉन’ कसा काय बनला?

View this post on Instagram

A post shared by Ankush Gedam (@ankushgedam_)

अंकुशनं एका मुलाखतीत म्हटलं, “मला रस्त्यावरुनच फिल्मसाठी सिलेक्ट करण्यात आलेलं. मी गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचत होतो. तेव्हा नागराज सरांचे भाऊ भूषण मंजुळे यांनी माझे फोटो आणि व्हीडीओ काढले. मी त्यांना विचारलं की, तुम्ही माझे फोटो का काढले? तेव्हा त्यांनी आम्ही शॉर्टफिल्म बनवणार असल्याचं सांगत मला ऑडिशनसाठी बोलावलं.”

भूषण मंजुळेंनीही माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, जवळपास सगळी मुलं मिळाली होती, पण डॉन मात्र मिळत नव्हता. त्याचं एक चित्र माझ्या डोळ्यांसमोर होतं आणि तसा मुलगाच मिळत नव्हता. नागपूरमधला मुक्काम हलवायची वेळ आली होती. जाऊ दे, पुढच्या वेळेस जाऊ तेव्हा पाहूया असं नागराजनंही म्हटलं. निघण्याच्या आधी असेच गाडीतून फिरत होतो. गणपती विसर्जनाचा दिवस होता. गड्डी गोदामच्या भागातून मिरवणूक चालली होती आणि एक मुलगा मिरवणुकीसमोर नाचत होता. त्याला पाहून मी तिथेच थांबलो.

भूषणनं त्याचं वर्णन केलं- त्यानं डोक्यावर खोट्या केसांचा मोठ्ठा विग घातला होता. जर्सी-बर्मुडा घातला होता आणि नाचत होता. त्याच्या पायाला स्प्रिंग लावल्यासारखं वाटत होतं, अंगात लयबद्धता होती…त्याला तसं नाचताना पाहून आमच्या लगेच लक्षात आलं की,आता डॉन सापडला.!

अंकुशने एका मुलाखतीत असे देखील सांगितले की, मी सिनेमात डॉनची भूमिका करणार हे माहीत ही नव्हतं’! मी पोलिस भरतीची तयारी करत होतो, सिनेमात दाखवलंय तसं मी कधीही नशा वगैरेही कधीच केली नाही. मला तर ऍक्टिंग पण येत नव्हती.

“मला एक सीन देण्यात आला. तेव्हा त्यांनी सांगितलं की, तू क्रिमिनल आहेस. मी म्हटलं, असं नाहीये. मग मला समजावण्यात आलं की तसं समज. तू क्रिमिनल आहे आणि तुला एक वॉचमन आत सोडत नाहीये. मी तो सीन करुन दाखवला. तो सीन त्यांना कदाचित आवडला असेल आणि म्हणूनच माझी या भूमिकेसाठी निवड झाली असेल.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप