मराठी चित्रपट सृष्टी, काळाप्रमाणे नवनवे प्रयोग करत बदलत राहिली. नाटकांमध्ये अभिनय करून जुन्या काळातील अनेक अभिनेत्री, अभिनेता यांनी आपल्या तडफदार अभिनयाने मराठी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. नुकतेच मराठी अभिनयातील दिगग्ज कलाकार म्हटले जाणारे रमेश देव यांचे नि धन झाले.
मृ त्यूसमयी ते ९३ वर्षांचे होते. याच प्रमाणे मराठी सिनेसृष्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत की, ज्यांना आता ओळखणे देखील महाकठीण काम झाले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. ८०-९० च्या दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टी ऐन बहरात असताना अनेक अभिनेता व अभिनेत्री या चंदेरी दुनियेत आपले नशीब आजमवण्यासाठी आले.
त्याचप्रमाणे त्याच्या अलीकडच्या काळात म्हणजे ७० च्या काळात देखील अनेक अभिनेत्री मराठी इंडस्ट्री मध्ये आल्या होत्या. त्यातील काही अभिनेत्रींनी आज देखील आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. यातील काही अभिनेत्री म्हणजे निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, अलका कुबल या! त्या आजही मराठी चित्रपटसृष्टी व मालिकांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहेत.
फटाकडी नावाचा एक चित्रपट आपण काही वर्षांपूर्वी पाहिला असेल. हा चित्रपट तेव्हा प्रचंड चालला होता. या चित्रपटांमध्ये अशोक सराफ, उषा किरण, सुषमा शिरोमणी, रमेश देव, यशवंत दत्त, विजू खोटे, श्रीराम लागू यांसारख्या दिगग्ज कलाकारांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन दत्ता केशव यांनी केले होते. हा चित्रपट तेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमावला होता.
या चित्रपटाचे लेखन हे सुषमा शिरोमणी यांनी केले होते. सुषमा शिरोमणी या अभिनेत्रीसोबतच लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्या देखील होत्या, तिन्ही जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पेलने हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. फटाकडी चित्रपटात सुषमा यांनी अतिशय भन्नाट काम केले होते. मात्र, हल्लीच्या काळात वाढत्या वयामुळे त्यांना आता ओळखणे देखील कठीण वाटत आहे.
सुषमा शिरोमणी यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या चित्रपटात काम देखील केले आणि हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी देखील झाले. यामध्ये भिंगरी, फटाकडी मोसंबी नारंगी , गुलछडी या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. भिंगरी चित्रपटामध्ये अरुणा इराणी देखील एका गाण्यावर नृत्य करत झळकल्या होत्या.
तसं पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षापासून सुषमा शिरोमणी या मराठी सिनेसृष्टीपासून दूरच आहेत. त्यामुळे त्यांना आता ओळखने देखील सोपे राहिले नाहीये!