विराट कोहली हा भारतीय संघाचा चमकणारा तारा आहे. विराट कोहली बऱ्याच दिवसा पासून ऑफ फॉर्म मध्ये आहे. कदाचित त्याचा फॉर्म त्याच्या वर नाराज आहे, त्यामुळे छोटे गोलंदाजही विराट कोहली समोर ब्रेट ली आणि शोएब अख्तरसारखे दिसू लागले आहेत. विराट कोहलीचा फॉर्म भारतीय संघा साठी चिंतेचा विषय आहे. यादरम्यान, भारताचा माजी कर्णधार कपिल देवने विराट कोहली बद्दल बरेच काही सांगितले आहे.
विराट कोहली च्या बॅटचे शेवटचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये केले होते. तेव्हा पासून विराट कोहलीची बॅट शांत आहे. आयपीएल २०२२ मध्ये ही विराट कोहली ची बॅट शांत राहिली आणि आरसीबी कडून खेळताना विराट कोहली च्या बॅटने २२.७३ च्या सरासरीने केवळ ३४१ धावा केल्या होत्या.
View this post on Instagram
भारतीय संघाला विराट कोहली च्या फॉर्मची चिंता करण्याचे मुख्य कारण म्हणजे यंदाच्या आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला खेळायचे आहे. विराट कोहलीची बॅट नाही चालली तर त्याच्यावर नक्कीच टीका होईल आणि हे कोणीही रोखू शकत नाही, असे मत भारताचा माजी कर्णधार कपिल देव याने व्यक्त केले आहे. कपिल देवने विराट कोहली च्या खराब फॉर्मची चर्चा केली आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना कपिल देव म्हणाला की, जर तुम्ही धावा करत नसाल तर आम्हाला वाटेल की त्यात नक्कीच काहीतरी चूक आहे. आम्हाला तुमच्यात फक्त एकच गोष्ट दिसते, तुमची कामगिरी आणि तुमची कामगिरी चांगली नसेल तर तुम्ही लोक गप्प राहतील अशी अपेक्षा करू शकत नाही. तुमची फलंदाजी आणि कामगिरी बोलली पाहिजे आणि दुसरे काही नाही.
कपिल देव पुढे म्हणाला की, विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूने शतक ठोकून बराच काळ लोटला आहे. याचे मलाही दुःख होते. तो आमच्या साठी हिरोसारखा आहे. सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांच्याशी तुलना होऊ शकेल असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल असे कधीच वाटले नव्हते. पण नंतर त्याने आपल्या कामगिरीशी तुलना करायला भाग पाडले होते. विराट कोहली जवळपास २ वर्षां पासून फॉर्म ऑफ फॉर्म मध्ये आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांनाच खटकते. मानसिकदृष्ट्या त्याला त्याची कामगिरी सुधरावी लागेल.