भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना काल खेळणारगेला . भारताने टी-20 मालिका जिंकली. पण एकदिवसीय मालिकेत विराट कोहली या मालिकेतील सामना खेळू शकणार नसल्याचा मोठा धक्का भारतीय संघाला बसला आहे.
View this post on Instagram
गेल्या काही काळापासून आपल्या फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला संघाच्या प्लेइंग 11 मध्ये वारंवार संधी दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. पण कर्णधार रोहित शर्माने पहिल्या एकदिवसीय सामन्या नंतर स्पष्ट केले होते की, संघ बाहेरच्यांचे न ऐकता गेम प्लॅननुसार खेळेल आणि विराटवर त्याचा विश्वास आहे.
View this post on Instagram
कालच्या सामन्यात नाणेफेक दरम्यान कर्णधार रोहित शर्माने विराट कोहली आज का खेळत नाही हे सांगितले. कारण स्पष्ट करताना रोहित शर्मा म्हणाला की, “विराट कोहली दुखापतीमुळे आजचा सामना खेळत नाहीये. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्यांची तपासणी करत आहे.
अशा स्थितीत तो पुढील सामन्यापर्यंत तंदुरुस्त राहण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून प्रदीर्घ कालावधीनंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीसाठी एकत्र आले होते.