ईशान किशनच्या या मोठ्या चुकीमुळे, कदाचित तो टीम इंडिया मधील आपले स्थान गमावू शकतो…!

टीम इंडिया सध्या इंग्लंडसोबत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला या कसोटी मालिकेत संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे तो टीम इंडियातून बाहेर पडत आहे. दरम्यान, ईशान किशनने एवढी मोठी चूक केली आहे. त्यामुळे आता भारतीय संघात इशान किशनला आणखी संधी मिळणार नाही.

या कारणामुळे इशान किशनला संधी मिळणार नाही:

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन अखेरचा विश्वचषक २०२३ नंतर ऑस्ट्रेलियासोबत ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसला होता. तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. पण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इशान किशनला भारतात खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये खेळण्यास सांगितले होते. पण इशान किशन अजूनही रणजी ट्रॉफीमध्ये खेळत नसून तो दुबईत फिरताना दिसला आहे. इशान किशनने त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. आता इशान किशनच्या या कृतीनंतर त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळणे कठीण आहे.

View this post on Instagram

A post shared by Ishan Kishan (@ishankishan23)

दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान क्रिकेटमधून ब्रेक घेतला: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत इशान किशनला संधी देण्यात आली होती. मात्र कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच मानसिक थकव्यामुळे त्याने संघातून आपले नाव मागे घेतले. त्यामुळे त्याला आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आलेली नाही. अफगाणिस्तानसोबतच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतही इशान किशनची निवड झाली नव्हती. त्याच वेळी, ईशान किशनचे कार्ड 2024 च्या T20 विश्वचषकातून देखील काढले जाऊ शकते.

IPL 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे: टीम इंडियाला ११ मार्चपर्यंत इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळायची आहे. तर आयपीएल 22 मार्चपासून सुरू होऊ शकते. त्यामुळे आता इशान किशन थेट आयपीएल २०२४ मध्येच खेळताना दिसणार आहे. आयपीएलमध्ये इशान किशन 5 वेळा चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याचवेळी, यावेळी आयपीएलमध्ये इशान किशन मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top