टीव्ही मालिका आणि त्यांचे टीआरपी यावर मालिकेचे खरे यश अवलंबून असते असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही! मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी लेखक-दिग्दर्शक वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स आणत मालिकेला मनोरंजन बनवत असतात. गेल्या काही महिन्यांपासून आपण सर्वे पहात होतो की झी मराठी या वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका ज्या सुरू झाल्या आहेत, या सर्व मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यात यश मिळवताना दिसत होत्या. यामध्ये माझी तुझी रेशीमगाठ, मन झालं बाजींद तसेच येऊ कशी तशी मी नांदायला अशा नवीन मालिकांचा समावेश झालेला.
यापैकीच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही झी मराठी वरील लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या बातम्या सूत्रांकडून सांगितल्या जात आहेत. या मालिकेतील गोंडस अभिनेत्री अन्विता फलटणकर म्हणजेच स्वीटू आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर म्हणजेच ओम या दोघांनीही मालिकेत निभावलेल्या त्यांच्या दमदार भूमिकेमुळे हे दोघे ही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात अल्पावधीतच यशस्वी झाले. या दोघांमुळे ही मालिका मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली असल्याचे समजते.
View this post on Instagram
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरण्यात चांगलेच यश मिळवले होते. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होत्या. या मालिकेमध्ये ओम आणि स्वीटू या जोडीची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. दरम्यान मालिकेत स्वीटूचे पहिले लग्न झालेले असून त्यानंतर ती पतीपासून घ टस्फोट घेते असे दाखवण्यात आले आहे.
यानंतर ओम आणि स्वीटू यांचे पुन्हा एकदा लग्न होते. त्यानंतर त्यांची खरी प्रेमकहाणी फुलायला सुरूवात होते, अशी या सिरिअलची कथा आहे. या मालिकेमध्ये अनेक घटना देखील दाखवण्यात आलेल्या आहेत. या मालिकेत स्वीटूची भूमिका निभावणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडियाच्या हँडल वरून एक पोस्ट टाकली होती.
या पोस्ट मधून तिने सर्वांना आनंदाची बातमी दिली असल्याचे समजते. त्या पोस्ट नुसार तिची ही गुड न्यूज म्हणजे तिने पहिल्यांदाच नवीन कार खरेदी केली होती. या कारचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत तिने शेअर केले. यावर तिला अनेकांनी खूप साऱ्या शुभेच्छा ही दिल्या होत्या. परंतु असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिकांच्या स्पर्धेमध्ये या मालिकेचा टीआरपी देखील मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचे चित्र समोर आले आहे.
टीआरपी कमी झाल्याने अनेक मालिका बंद पडताना दिसतात. काही कालावधीतच अगदी लोकप्रिय असलेल्या मालिका देखील बंद पडल्या असल्याचे वृत्त समजते! यामध्ये आपल्याला स्वामिनी या मालिकेचा प्रामुख्याने उल्लेख करता येऊ शकतो. स्वामिनी ही मालिका दर्जेदार झाली होती. मात्र, या मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळायला लागल्याने ही मालिका बंद करण्याची वेळ आली. सुरुवातीला या मालिकेची वेळ बदलण्यात आली. पण त्यानंतर मात्र ही मालिका बंद करण्यात आली.
या प्रमाणे इतर लोकप्रिय मालिका देखील अशाच रीतीने बंद करण्यात आल्या. आतादेखील येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका कमी टीआरपी मिळत असल्याने लवकरच बंद होणार असल्याचे समजते. या मालिकेच्या जागी एक नवीन मालिका सुरू होणार असल्याचे झी कडून सांगण्यात येत आहे. येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका बंद होण्याचे कारण म्हणजे या मालिकेच्या कथानकात वेळोवेळी केले जाणारे बदल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नसल्याने याचा टीआरपी प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरला आहे.
टीआरपी घसरला म्हणजेच मालिकाही प्रेक्षक आवडीने बघत नसल्याने मालिका चालत नाही. यामुळे निर्माता-दिग्दर्शकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यामुळे त्यांना देखील वेगवेगळ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते आणि परिणामी मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना मानधन देखील देता येत नाही. त्यामुळे ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे. या मालिकेच्या जागी स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर या जोडीची ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका सुरू होताना दिसणार आहे.
आपण येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका पाहात होतात का? यातल्या ओम आणि स्वीटूची जोडी कशी होती ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा!