IND VS ENG: 4th कसोटीसाठी इंग्लंड-भारत प्लेइंग इलेव्हन जाहीर, ब्रिटिशांनी पाकिस्तानी खेळाडूलाही दिली संघात जागा, कोहलीचा कट्टर विरोधक परतला..!

टीम इंडिया आणि इंग्लंड  यांच्यात 25 जानेवारी पासून हैदराबादच्या मैदानावर कसोटी मालिका खेळवली जात आहे. इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आतापर्यंत 3 सामने खेळले गेले असून या कसोटी मालिकेत टीम इंडिया सध्या 2-1 अशी आघाडीवर आहे.

कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारी पासून रांचीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे, ज्यासाठी इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने चौथ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने रांची कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये पाकिस्तानी खेळाडूसह विराट कोहलीच्या शत्रूला संधी दिली आहे.

शोएब बशीरला रांची कसोटी सामन्यात संधी : पाकिस्तानी वंशाचा इंग्लिश खेळाडू शोएब बशीरने विशाखापट्टणम कसोटी सामन्यात इंग्लंड संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. शोएब बशीरने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती पण असे असतानाही राजकोट कसोटी सामन्यात शोएब बशीरला प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. रांची कसोटी सामन्यात शोएब बशीरला कर्णधार बेन स्टोक्सने रेहान अहमदच्या जागी खेळण्याची संधी दिली आहे.

इंग्लंडच्या प्लेइंग 11 मध्ये ऑली रॉबिन्सनलाही संधी मिळाली आहे: आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंडसाठी 19 सामन्यांत 76 विकेट घेणारा युवा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनला भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारता विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आहे.  भारताच्या इंग्लंड दौऱ्यात ऑली रॉबिन्सनने अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्या दौऱ्यात ओली रॉबिन्सनने विराट कोहलीला त्याच्या बॉल्सने खूप त्रास दिला होता. त्यामुळे अनेक भारतीय क्रिकेट समर्थक सोशल मीडियावर ओली रॉबिन्सनला विराट कोहलीचा शत्रू अशी उपाधी देताना दिसत आहेत.

रांची कसोटी इंग्लंडचा संघ ११ : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फॉक्स, जेम्स अँडरसन, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि ऑली रॉबिन्सन.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top