४ विकेट्स घेऊनही कुलदीप होता निराश, या चुकीमुळे देतोय स्वतःला दोष ..!!

भारत दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या शानदार गोलंदाजीने आफ्रिकन फलंदाजांचे कंबरडे मोडले. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना खेळला. या सामन्यात कुलदीप यादवने आपल्या घातक गोलंदाजीने विकेट्सचा पाऊस पडला.

वास्तविक, फिरकी गोलंदाजी ही भारताची नेहमीच ताकद राहिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने हा मुद्दा पुन्हा एकदा सिद्ध केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीपला फक्त ४ षटके टाकण्याची संधी मिळाली. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त १८ धावा दिल्या आणि ४.३२ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आणि त्याच्या खात्यात चार विकेट घेतल्या. यादरम्यान त्याला हॅटट्रिकची संधीही मिळाली पण त्याला हॅटट्रिक करता आली नाही.

त्याचवेळी, सामन्यानंतर कुलदीप यादवने ब्रॉडकास्टरशी त्याच्या कामगिरीबद्दल बोलताना सांगितले की, मी माझ्या कामगिरीवर फारसा खुश नाही कारण हॅट्रिक घेण्याची संधी वारंवार येत नाही. बर्‍याच दिवसांनी मी चार विकेट घेतल्या आहेत त्यामुळे मला आनंद झाला आह पण, माझी हॅटट्रिक चुकली याच दुःख हि कुठंतरी मनात आहे.

तो पुढे म्हणाला, ‘वॉशिंग्टनने खूप चांगली गोलंदाजी केली. मी फक्त माझ्याच लयीत काम करत आहे. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर मी माझ्या लयीवर काम केले आणि ते आयपीएलपासूनच माझ्यासाठी काम करत आहे. मी माझ्या बोल टाकण्याच्या वेगावर काम केले पण बदल्यात मी माझ्या वेगाशी तडजोड केली नाही.

या वर्षात कुलदीप यादवने भारतीय संघासाठी आतापर्यंत सात एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ११ विकेट आहेत. कुलदीपच्या गोलंदाजीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने ७ सामन्यात केवळ ४.८९ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. या इकॉनॉमी रेटमध्ये फिरकीपटूने गोलंदाजी करणे खरोखरच कौतुकास्पद आहे.

त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत कुलदीप यादवने ६ विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत कुलदीप यादवने आपल्या शानदार गोलंदाजीने आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२३ खेळण्याचा दावा केला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप