बॉलीवूडच्या अभिनेत्री सुद्धा ज्यांच्या समोर फिक्या दिसतील अशा अप्सरा सारख्या सुंदर पत्नी आहेत साऊथ स्टारच्या!

बॉलिवूड सिने इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री मानली जाते, जिथे दररोज नवे चेहरे येत जात असतात, पण आजच्या काळात बॉलिवूड सिनेमांमध्ये दाखवण्यात येणारा एकाच धाटणीच्या चित्रपटांमुळे अनेक चित्रपट रसिक दक्षिण सिनेमांकडे वळलेले आहेत! साऊथचे सिनेमे प्रेक्षकांनाही बघायला आवडतात आणि त्यामुळेच आज दक्षिण इंडस्ट्री म्हणजेच टॉलिवूडचे कलाकारही जगभर प्रसिद्ध झाले आहेत.

आजच्या काळात लोकांना साऊथ सिनेमाच्या स्टार्सचे चित्रपट पाहणे एवढे आवडते की बॉलिवूड निर्मातेदेखील बऱ्याच दक्षिण भारतीय चित्रपटांचे चित्रपट निर्मितीचे हक्क विकत घेऊन चक्क त्याचा हिंदी रिमेक बनवतात! यातले जरी काही चित्रपट यशस्वी ठरले असले तरी काही फक्त दक्षिण भागात हिट झाले आहेत पण हिंदीमध्ये मात्र ते प्रेक्षकांची मने जिंकण्यात दुर्दैवी ठरले आहेत.

आजच्या आमच्या या लेखामधून आम्ही तुम्हाला दक्षिणेकडील सुपरस्टार्स आणि त्याची असणारी बायको या विषयी माहिती देणार आहोत. तुम्ही जर का वेगवेगळ्या दक्षिण सुपरस्टार्सच्या बायकोकडे पाहिले तर त्यांचं सौंदर्य पाहून त्यांचे कौतुक करण्यासाठी स्वत: ला अजिबात थांबवु शकणार नाहीत. सौंदर्याच्या बाबतीत त्या बॉलिवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देतात.

अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी

सध्या पुष्पा सिनेमामुळे चर्चेत आलेला दक्षिणेकडील सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या सर्वांना चांगलाच माहीत आहे. दक्षिणेकडील बर्‍याच मुली त्याच्या अभिनयाच्या फॅन आहेत. दिवसेंदिवस अल्लू अर्जुन चाहत्यांची त्याच्या फॅनफॉलोविंग मध्ये भर पडत असते. अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांचा विवाह ६ मार्च २०११ रोजी झाला. स्नेहा व्यावसायिका कंचर्ला चंद्रशेखर रेड्डी यांची मुलगी आहे. सध्या अल्लू अर्जुनच्या फॅमिली मध्ये त्यांना दोन मुले, एक मुलगा आणि एक मुलगी आहेत.

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर

View this post on Instagram

A post shared by Namrata Shirodkar (@namratashirodkar)


महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची भेट पहिल्यांदा सन २००० मध्ये ‘वंशी’ चित्रपटाच्या सेटवर झाली आणि येथून त्यांचे बहुचर्चित प्रेमप्रकरण सुरू झाले आणि नंतर १० फेब्रुवारी २००५ रोजी त्यांनी नम्रता सोबत वाजतगाजत लग्न केले. नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची जोडी दक्षिण उद्योगातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक मानली जाते. आज महेश बाबू हे दक्षणेकडचे सुपरस्टार आहेत. त्याचबरोबर नम्रता शिरोडकर हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही राहिल्या आहेत.

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत
धनुष हा दक्षणेचा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे. धनुषने दक्षिण सिनेमांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे, ज्याला हिंदी प्रेक्षकांनी देखील पसंती देत डोक्यावर घेतलं होतं. धनुषने १८ नोव्हेंबर २००४ रोजी रजनीकांतची मोठी मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्याशी लग्न केले आणि त्यांना लिंगा आणि यात्रा राजा या नावाची दोन मुले आहेत.

एनटीआर रामराव जूनियर आणि लक्ष्मी प्रणती~


एनटीआर रामराव जूनियर या कडे दक्षिण सिनेइंडस्ट्रीमध्ये अष्टपैलू अभिनेता म्हणून पाहण्यात येते आणि तिकडे त्याची फॅन फॉलोव्हिंग देखील प्रचंड आहे. २०११ मध्ये त्याचे लग्न नारने श्रीवास्तव यांची मुलगी लक्ष्मीशी झाले होते.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप